www.24taas.com झी मीडिया , नवी मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा टोलविरोधी आक्रमक भूमिका घेतलीय. टोल नाक्यावर टोल भरू नका, कोणी आडवे आले तर फोडून काढा असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. त्यानंतर लगेच याची अंमलबजावणी केली आणि ऐरोली आणि मुलंडमधील टोल नाक्याची तोडफोड केली गेली.
राज ठाकरे यांच्या आदेशामुळे पुन्हा एकदा टोल आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. यावेळी राज यांनी अजित पवारांनाही टोला लगावतांना दादागिरीची भाषा बोलू नका असा इशारा दिलाय. राज ठाकरे यांनी आज नवी मुंबईतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले.त्यावेळी ते बोलत होते.
यापुढे कोणीही टोल भरू नका. मनसेनेने टोलविरोधात सर्वप्रथम मोठं आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारने ६५ टोल नाके बंद केलेत. रस्ता बांधून झाल्यानंतर टोल सुरू करायचा असतो. इथं आधीच टोल नाके उभारले जातात. यापुढे कोणीही टोल भरू नका. जर कोणी मागितला तर त्याला उत्तर द्या. मागणी केली तर त्याला तुडवून काढा. यापुढे कोणीही टोल भरायचा नाही. जे काही व्हायचे असेल ते होऊ द्या, असा आदेश राज यांनी दिला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.