तेलगळतीमुळे माशांवर संकट, फटका मच्छिमारांना

रासायनिक कंपन्यांचं प्रदूषण आणि सतत होणा-या तेलगळतीमुळे रायगडच्या किना-यांवर माशांचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय. याचा मोठा फटका मच्छिमारांना बसतोय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 6, 2013, 06:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अलिबाग
रासायनिक कंपन्यांचं प्रदूषण आणि सतत होणा-या तेलगळतीमुळे रायगडच्या किना-यांवर माशांचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय. याचा मोठा फटका मच्छिमारांना बसतोय.
गेल्या चार महिन्यांपासून इथं मासे मिळेनासे झालेत. दहा-बारा दिवस खोल समुद्रात जाऊनही अनेकदा हात हलवत परत येण्याची वेळ कोळी बांधवांवर आलीये. रायगड जिल्ह्यातल्या सर्व बंदरांमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.
पाहा व्हि़डिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.