छेड काढलीत तर सॅंडलचा जोरका झटका

महिलांची कोणी छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मदतीला सॅंडल धाऊन येणार आहे. ठाण्यातल्या काही विद्यार्थ्यांनी महिलांना अडचणीच्या वेळी मदत करणारी एक सँडल तयार केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 7, 2013, 12:44 PM IST

www.24taas.com,ठाणे
महिलांची कोणी छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मदतीला सॅंडल धाऊन येणार आहे. ठाण्यातल्या काही विद्यार्थ्यांनी महिलांना अडचणीच्या वेळी मदत करणारी एक सँडल तयार केलीय.
देशभरात महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराची प्रकरणं वाढत आहेत. ती रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी होत आहे. तर काही जण मुलींना कराटे शिकवा, काही जण महिलांनी सोबत मिरची पूड ठेवण्याचा सल्ला देत आहेत. मात्र ठाण्यातल्या काही विद्यार्थ्यांनी महिलांना अडचणीच्या वेळी मदत करणारी एक सँडल तयार केलीय.
आता सँडल हीच चप्पल महिलांच्या संरक्षणाचं प्रभावी हत्यार ठरू शकते. ही किमया केली आहे ठाण्यातल्या चिल्ड्रन टेक सेंटरच्या चार शाळकरी मुलांनी. आधुनिक तंत्रज्ञनाचा वापर करुन मुलांनी ही चप्पल तयार केलीय.

सध्या या चप्पलची किंमत दोन हजार रुपये असली तरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्यानंत ती ६०० ते ७०० रुपयांपर्यंत मिळू शकणार आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन या चप्पलमध्ये आणखी सोई सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

महिलांच्या सुरक्षितेसाठीच्या सॅन्डलचे हे तंत्रज्ञान रेडिओ फ्रिक्वेन्सी डिव्हाईसच्या साह्याने विकसित करण्यात आले आहे. महिलेच्या पर्समध्ये असणारा सायरनचा ब्लॅक बॉक्‍स असेल. या बॉक्‍समध्ये रेकॉर्डिंगचीही सुविधा आहे. हा बॉक्‍स वॉटरप्रुफ असेल. या बॉक्‍समध्ये जीपीएस यंत्रणाही असल्याने पोलिसांना ती साह्यभूत ठरणार आहे. आता ही आधुनिक चप्पल महिलांवरील अत्याचार रोखण्यात कितपत फायद्याची ठरते ते पाहावं लागेल.