बिग बीला पुन्हा पोटदुखीचा त्रास

बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे.त्यामुळे मला लगेच सीटी स्कॅन करुन घ्यावे लागणार आहे. ही बातमी खुद्द बीग बी यांनी ट्विटरवर माहिती देताना दिली आहे.

Updated: Apr 10, 2012, 10:27 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे.त्यामुळे मला लगेच सीटी स्कॅन करुन घ्यावे लागणार आहे. ही बातमी खुद्द बीग बी यांनी ट्विटरवर माहिती देताना दिली आहे.

 

 

दोन महिन्यांपूर्वी सेव्हन हिल्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्यांच्या पोटदुखीचा त्रास कमी झाला नव्हता. त्यामुळे दुस-यांदा शस्त्रक्रिया करावी लागली होती. आता दोन महिन्यानंतर माझ्या पोटात पुन्हा वेदना होत आहेत. त्यामुळे मला लगेच सीटी स्कॅन करुन घ्यावे लागणार आहे, असे बिग बी यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे.

 

 
अमिताभ बच्चन यांच्यावर दोन महिन्यापूर्वी केलेली पहिली शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी न झाल्याने शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्या पोटदुखीचा त्रास कमी झाला नव्ह्ता. याशिवाय त्यांच्या पोटात इन्फेक्शन झाले असल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. त्यानंतर पुरेशी विश्रांती घेऊन पूर्णपणे बरे वाटल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आज बिग बी सीटी स्कॅन करण्याची शक्यता आहे.