सोहेल खानच्या कारने चिरडलं वृद्ध महिलेला

मुंबईत अभिनेता सोहेल खानच्या कारने एका वृद्ध महिलेला चिरडलंय. या घटनेत वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. रात्री 12.30च्या सुमारास वांद्र्यात ही घटना घडली. या घटनेच्या वेळी सोहेल खान कारमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय.

Updated: Jul 2, 2012, 12:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत अभिनेता सोहेल खानच्या कारने एका वृद्ध महिलेला चिरडलंय. या घटनेत वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. रात्री 12.30च्या सुमारास वांद्र्यात ही घटना घडली. या घटनेच्या वेळी सोहेल खान कारमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र ही कार अरबाज खानची असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अरबाजचीही चौकशी  होण्याची शक्यता आहे.

 

या घटनेनंतर पोलिसांनी सोहेल खानचा ड्रायव्हर धनंजयला अटक केली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता का याची चौकशी करण्यात येणार आहे. शिवाय याप्रकरणी अभिनेता सोहेल खानची चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

 

यापूर्वी सोहेल खान याचा मोठा भाऊ आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सलमान खान यानेही २००२ साली याच भागात दारूच्या नशेमध्ये आपली लँड क्रुझर ही आलिशान गाडी फुटपाथवर घुसवली होती. त्यावेळी फुटपाथवर झोपलेले कामगार जखमी झाले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता.