www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांनी आपल्या ‘काँग्रेसला नवीन विचारधारेची गरज’ असल्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं त्यांनी म्हटलंय.
‘मी मीडियाशी ज्या पद्धतीने बोललो त्या सगळ्या वाक्यांचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला गेला. आता नवीन लोकांनी येऊन पक्षाला पुढे न्यायला हवंय, असं माझं म्हणणं होतं. आणि त्याचमुळे मी राहुल गांधी यांनी जबाबदारी स्विकारावी असं म्हटलं होतं. ही सध्याची गरज आहे’, , असं स्पष्टीकरण आता सलमान खुर्शीद यांनी दिलंय.
सोबतच ‘काँग्रेस दिशाहीन झालीय असं मी कधी म्हटलंच नव्हतं. आणि काँग्रेस दिशाहीन नाही. राहुल गांधी हे माझे नेता आहेत, मी त्यांचा नेता नाही’ असंही खुर्शीद यांनी यावेळी म्हटलंय. पण, यानंतर मात्र आपण कधीही मोकळेपणानं मीडियाशी संवाद साधणार नसल्याचं खुर्शीद यांनी जाहीर केलंय.