Horoscope 2 April 2022: रविवारी 'या' 5 राशी होतील मालामाल

रविवारी या  पाच राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार, तुमची कोणती आहे रास?  

Updated: Apr 10, 2022, 07:52 AM IST
Horoscope 2 April 2022:  रविवारी 'या' 5 राशी होतील मालामाल title=

मेष : नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नवीन ध्येय ठेवण्यासाठी दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतील. जुन्या कर्जातून सुटका होईल.

वृषभ : कुटुंब आणि प्रेमात समजदारी दाखवावी लागेल.. अनेक अडकलेली कामे पूर्ण होतील. कोणत्या रिसर्च प्रोजेक्टवर काम कराल. व्यापार करणाऱ्या लोकांनी प्रामाणिक रहाण्यााची गरज आहे. वेळेत सर्व जबाबदाऱ्या पार कराल. 

मिथुन: आज तुम्ही सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाकडे विशेष लक्ष द्याल. आज तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस एखादा मोठा छंद पूर्ण करण्यात घालवू शकता. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहेत. व्यवसायात नफा मिळू शकतो. बेरोजगारांना इच्छित नोकरी मिळू शकते.

कर्क : जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन सकारात्मक असेल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामं पूर्ण होतील.  कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमची समाजात प्रतिष्ठा वाढवेल. कोणत्याही प्रॉपर्टी डीलरसाठी रविवार लाभदायक आहे. वायफळ खर्च करू नका.

सिंह: दुसऱ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्या. अधिकाऱ्यांसोबत खास ओळखी होतील. अनावश्यक खर्चात कपात करा. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. मेहनतीचं फळ गोड मिळेल. 

कन्या : तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केलं तर तुम्ही अधिक पैसे कमवू शकता. घरातील कार्यालयीन काम करणाऱ्या लोकांमुळे वरिष्ठ आनंदी राहतील.

तूळ: तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं लगेच फळ मिळेल. मुलांसाठी तुम्ही कोणतीही गुंतवणूक करू किंवा मालमत्ता घेऊ शकता. 

वृश्चिक : रविवार तुमच्यासाठी खूप चांगला परिणाम देणारा आहे. इतरांचे सहकार्य मिळणं तुम्हाला सोपं असेल. नवीन कपडे किंवा काही घरगुती वस्तू महिला खरेदी करू शकतात.

धनु : रविवारचा दिवस तुमच्यासाठी शांततापूर्ण राहील. तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायात बुद्धीचा वापर कराल म्हणजे तुमचं काम बिघडण्यापासून वाचेल. पैशाची तुमची चिंता दूर होऊ शकते. 

मकर : दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची आवड वाढण्याची चिन्हं आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन कल्पना मांडू शकता. व्यवहाराशी संबंधित कामे पूर्ण करू शकाल.

कुंभ : रविवार तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न कराल. परिश्रमाचे अनुरूप लाभ न मिळाल्याने निराशा होऊ शकते.

मीन : रविवारी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तर नशिबाची साथ आज तुम्हाला लाभणार आहे. अचानक धनलाभ होवू शकतो.  एवढंच नाही तर अडकलेले पैसे देखील मिळू शकतात.