अक्षय्य तृतीयेला चुकूनही करू नका 'या' चुका...सुख-समृद्धीही जाते आणि होतात वाईट परिणाम!

अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी केलेले शुभ कार्य जीवनात सुख-समृद्धी आणते आणि भरपूर लाभ देते.

Updated: May 3, 2022, 09:47 AM IST
अक्षय्य तृतीयेला चुकूनही करू नका 'या' चुका...सुख-समृद्धीही जाते आणि होतात वाईट परिणाम! title=

मुंबईः अक्षय्य तृतीयेचा दिवस हा शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी आपण सोने-चांदी, घर-गाडी इत्यादी खरेदी करतो, यामुळे घरात सुख-समृद्धी तर वाढतेच, पण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या चुकाही महागात पडू शकतात.


अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी केलेले शुभ कार्य जीवनात सुख-समृद्धी आणते आणि भरपूर लाभ देते. त्यामुळे अक्षय्य तृतीया ही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी विशेष मानली जाते. यासोबतच अक्षय्य तृतीयेला काही कामं करण्यासही मनाई करण्यात आली आहे. 

त्यामुळे या दिवशी असं कोणतंही काम करू नये, जे अशुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरी रिकाम्या हाताने येऊ नका. काहीतरी खरेदी नक्की करा. जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करू शकत नसाल तर निराश होण्याची गरज नाही. या दिवशी तुम्ही मातीची भांडी, पितळ इत्यादी देखील खरेदी करू शकता. त्यांची खरेदी देखील खूप शुभ मानली जाते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. पूजेत भगवान विष्णूला तुळशी अर्पण करा, परंतु हे लक्षात ठेवा की तुळशीला नखाने तोडू नका आणि स्नान केल्याशिवाय स्पर्श करू नका. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची स्वतंत्रपणे पूजा करण्याची चूक कधीही करू नका. त्यांची नेहमी एकत्र पूजा करा. अन्यथा त्यांची नाराजी आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराचा कोणताही भाग अंधारात किंवा अस्वच्छ राहू देऊ नका. या दिवशी घर स्वच्छ करा आणि सर्वत्र दिवा लावा. तुळशीच्या लेपात दिवा अवश्य ठेवा. याशिवाय संध्याकाळी मुख्य दारावर तुपाचा दिवा लावावा. या दिवशी अवश्य दान करा. विशेषत: एखाद्या गरीबाने काही मागितले तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. त्याला अन्न, वस्त्र, पैसा काहीही दान करा.