विराटच्या डबल सेंच्युरीमुळे 'या' भारतीय क्रिकेटरच्या डबल धमाक्यावर पडदा

श्रीलंकेविरोधात नागपूर टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने केलेल्या डबल सेंच्युरीची चर्चा सर्वत्र होत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 27, 2017, 09:04 AM IST
विराटच्या डबल सेंच्युरीमुळे 'या' भारतीय क्रिकेटरच्या डबल धमाक्यावर पडदा  title=
File Photo

अमृतसर : श्रीलंकेविरोधात नागपूर टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने केलेल्या डबल सेंच्युरीची चर्चा सर्वत्र होत आहे.

आणखीन एका क्रिकेटरची डबल सेंच्युरी 

विराटने केलल्या डबल सेंच्युरीनंतर आणखीन एका क्रिकेटरने डबल सेंच्युरी केली आहे. या क्रिकेटरचं नाव आहे अनमोलप्रीत सिंह...

नॉट आऊट २५२ रन्स 

जबरदस्त फॉर्मात असलेल्या अनमोलप्रीत सिंह याने नॉट आऊट २५२ रन्स केल्याने पंजाबच्या टीमने रविवारी (२६ नोव्हेंबर) रणजी ट्रॉफीतील ग्रुप डीच्या मॅचमध्ये सहा विकेट्स गमावत ६४५ रन्सचा डोंगर उभा केला.

पंजाबने इनिंग केली घोषित 

रणजी ट्रॉफीत पंजाब विरुद्ध सेना यांच्यात झालेल्या मॅचमध्ये पंजाबने ६४५ रन्स करत इनिंग घोषित केली. त्यानंतर विरोधी टीमने चार विकेट्स गमावत १३० रन्स केले.

पंजाबने रचला रन्सचा डोंगर 

पंजाबच्या टीमने दुसऱ्या दिवशी ३९५ रन्सवर दोन विकेट्स गमावले होते आणि त्यानंतर पूढे खेळण्यास सुरुवात केली होती. पंजाबच्या टीमकडून अनमोलप्रीत दमदार बॅटिंग करत होता. मात्र, दुसरीकडून एक-एक विकेट पडत होती. गुरकीरत सिंह ७० रन्सकरुन आऊट झाला. दिवेश पठानियाने १७० रन्स, जीवनज्योत सिंहने ६४ रन्स आणि सचिदानंद पांडेने १२० रन्स केले.