व्यक्तिविशेष : आशिष नेहरा मैदानावरचा आणि मैदना बाहेरचासुद्धा...

फिरोजशहा कोटला मैदान आणि क्रिकेटप्रेमीसुद्धा आज एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षिदार ठरत आहे. कारण, एक जिंदादील क्रिकेटपटू आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेत आहे. आशीष नेहरा असे या क्रिकेटपटूचे नाव. या महत्त्वपूर्ण क्षणी नेहराच्या खास चाहत्यांसाठी त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर टाकलेला हा कटाक्ष...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 1, 2017, 05:01 PM IST
व्यक्तिविशेष : आशिष नेहरा मैदानावरचा आणि मैदना बाहेरचासुद्धा...

अण्णासाहेब चवरे, झी मीडिया, मुंबई : फिरोजशहा कोटला मैदान आणि क्रिकेटप्रेमीसुद्धा आज एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षिदार ठरत आहे. कारण, एक जिंदादील क्रिकेटपटू आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेत आहे. आशीष नेहरा असे या क्रिकेटपटूचे नाव. या महत्त्वपूर्ण क्षणी नेहराच्या खास चाहत्यांसाठी त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर टाकलेला हा कटाक्ष...

आशिष नेहरा म्हणजे एक उत्साही आणि हटके व्यक्तीमत्व. मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरील घटना, घडामोडींमध्ये एक खेळाडू म्हणून सर्व बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकाराचे गणीत करूणही बाकी जो नेहरा उरतो.. तोही तितकाच खणखणीत असतो. जो गणीत करण्यापूर्वी असतो…

२९ एप्रिल २०१६ या त्याच्या वाढदिवसापर्यंत त्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्युजीलंडविरूद्ध २० धावा, पाकिस्तानविरूद्ध २० आणि बांगलादेश विरूदध २९ धावा देऊन प्रत्येकी एक बळी घेतला. विशेष म्हणजे तोपर्यंत १७ टेस्ट मॅच खेळणारा नेहरा यापूर्वीचा आणि शेवटची टेस्ट मॅच सन २००४ मध्ये खेळला होता. पाकिस्तानातील रावळपिंडी येथील हा सामना अनेक क्रिकेटरसीकांच्या आजही लक्षात आहे. नेहराने आतापर्यंतचा आपला शेवटचा एकदिवसीय सामनाही २०११ मध्ये पाकिस्तानविरूदधच सन खेळला. हा समाना विश्वचषकासाठी क्रिकेट टूर्नामेंटच्या सेमीफाईनलसाठी मोहालीत खेळला गेला होत. यवर्षी टी-२०च्या माध्यमातून भारतीय संघात प्रवेश करण्यापूर्वी त्याने यापूर्वीचा टी-२० सामानाही सन २०११ मध्ये दक्षिण अफ्रिकेविरूद्ध डरबन येथे खेळला होता.

चटका लावणारा अर्धविराम आणि पुनरागमन

नेहराला चटका लावणारा अर्धविराम घ्यावा लागला. त्याच्या अर्धविरामाचे कारण हे त्याची कामगिरी किंवा खेळ कधीच नव्हती. मात्र, त्याचा फिटनेस हाच त्याचा दुश्मन बणला होता. दुखापत आणि वारंवार कमी होत असलेला फिटनेस हेच त्याच्या अर्धविरामाचे कारण बणले. तरीही नेहराने आपले पूर्ण लक्ष गोलंदाजी आणि फिटनेसवर केंद्रीत केले. गेल्या वर्षी आयपीएल मध्ये तो चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. त्यात त्याने १६ मॅचमध्ये आपल्या गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत २२ बळी घेतले.

इतक्या सुंदर कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया आणि न्युजीलंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी नेहराची निवड होईल असे वाटले होते. मात्र, तसे होऊ शकले नाही. त्यानंतर मात्र नेहराने आवाज उठवला आणि तक्रार केली की, निवडसमीती जाणिवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे. नेहराची याच वर्षी टी-२० मध्ये पुन्हा वापसी झाली. विशेष असे की, भारताने तेथे पहिल्यांदा टी-२० मालिका जिंकली. त्यानंतर नेहरा भारतात श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका आणि त्यानंतर बांग्लादेश येथे आयोजित करण्यात आलेली अशिया कप टी-२० मालीकाही खेळला. पुनरागमनानंतर नेहराने १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६ बळी घेतले आहेत. अशिया चषकमध्ये बांगलादेशविरोधात २३ धावा देऊन तीन बळी घेण्याची उत्कृष्ट कामगिरीही त्याने केली आहे.

अशीष नेहरा मीडियापासूनही काहिसे दूर राहणेच पसंत करतो. ईतके की त्याने बांगलादेशविरूद्ध सामना खेळण्य़ापूर्वी बोलताना सहज आठवण म्हणून सांगितले की, मी आजही मी माझ्या जून्या मोबाईलसोबतच आनंदी आहे. विशेष म्हणजे आजच्या समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) जगात फेसबुक किंवा ट्विटरवरही नाही.

आपल्यापेक्षा नव्या आणि तरूण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात नेहरा विशेष आवड दाखवतो. टी-२० विश्वचषकासाठी परवाच झालेल्या भारत – बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यात आपणही हे पाहिले असेल. बांगलादेशने भारताच्या नाकी दम आणला तेव्हा, शेवटच्या षटकात नेहरा कप्तान धोनी आणि गोलंदाज हार्दीक पंड्यासोबत मैदानावर सतत सल्लामसलत करत होता.

सध्या नेहराने फिटनेसकडे जोरदार लक्ष दिले आहे. ते केवळ टी-२० किंवा आयपीएल सामने खेळण्यासाठी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी. त्यामुळे येत्या २९ एप्रिलला नेहरा ३७ वर्षांचा होत असला तरी, वाढते वय हा त्याच्यासाठी केवळ एक अंक असेल. तो आपल्या कामगिरीने यशाचा टप्प नेहमीच गाठत राहील. कारण तो एक जबरदस्त गोलंदाज आहे……!

(टीप  - आशीष नेहराच्या क्रिकेट कारकिर्दीसंदर्भात दिलेली आकडेवारी ही त्याच्या २९ एप्रिल २०१६ पूर्वीची आहे.)