मुंबई : आशिया चषक 2022 स्पर्धेला (Asia Cup 2022) 27 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. मात्र क्रिकेट चाहत्याचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या महामुकाबल्याकडं लागून राहिलं आहे. हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी 28 ऑगस्टला आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. (asia cup 2022 ind vs pak team india vs pakistan head to head records)
दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी 9 महिन्यांनी पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. याआधी दोन्ही संघांचा टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये सामना झाला होता. तेव्हा पाकिस्तानने टीम इंडियावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आता टीम इंडिया या पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहे.
आशिया कप स्पर्धेत या दोन्ही संघापैकी आतापर्यंत कोणाचा वरचष्मा राहिलाय, हे आपण या महामुकाबल्याआधी जाणून घेणार आहोत.
आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे 1984 पासून करण्यात येतंय. पहिल्यांदा 1984 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तेव्हा भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे 3 संघांना समावेश होता.
आशिया कपमध्ये टीम इंडिया-पाकिस्तानचा आतापर्यंत एकूण 14 वेळा आमनेसामने आले आहेत. या दरम्यान 1997 मध्ये झालेल्या एका सामन्याचा निकाला लागला नाही. त्यामुळे 13 पैकी 8 सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवला. तर पाकिस्तानला फक्त 5 वेळा यश आलंय.
दरम्यान टीम इंडियाने एकूण 14 पैकी सर्वाधिक 7 वेळा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. त्यानंतर श्रीलंकेने 5 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर पाकिस्तानला 2 वेळाच यश आलंय.
आशिया कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि आवेश खान.