पाकिस्तानचा विरोध, भारताऐवजी युएईमध्ये होणार आशिया कप

भारत आणि पाकिस्तानमधल्या ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटला बसला आहे.

Updated: Apr 10, 2018, 07:27 PM IST
पाकिस्तानचा विरोध, भारताऐवजी युएईमध्ये होणार आशिया कप  title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधल्या ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटला बसला आहे. यावर्षी भारतात होणाऱ्या आशिया कपला पाकिस्ताननं विरोध केल्यामुळे ही स्पर्धा आता युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. सप्टेंबर १३ ते २८ यादरम्यान ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते. भारत-पाकिस्तानमधल्या खराब संबंधांमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचं आशिया क्रिकेट काऊन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी सांगितलं आहे.

या टीम खेळणार आशिया कप

आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानच्या टीम सहभागी होणार आहेत. तर युएई, हाँगकाँग, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया आणि ओमान यापैकी एक टीम आशिया कपमध्ये क्वालिफाय होणार आहे.

आशिया कप टी-20 होणार

२०१८ मध्ये होणारा आशिया कप हा १४वा आहे. याआधीच्या १२ स्पर्धा या ५० ओव्हरच्या झाल्या होत्या. पण २०१६ साली ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आली होती. २०१६ सालच्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून या स्पर्धेकडे बघितलं गेलं होतं. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या स्पर्धेत भारतानं फायनलमध्ये बांग्लादेशला हरवलं होतं.