सौरव गांगुलीने सांगितली विराटची कॅप्टन्सी जाण्याची संपूर्ण कहाणी

रोहित शर्माला टी 20 नंतर वनडे टीमच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहितला विराट कोहलीच्या जागी कर्णधार करण्यात आलं.

Updated: Dec 10, 2021, 04:17 PM IST
सौरव गांगुलीने सांगितली विराटची कॅप्टन्सी जाण्याची संपूर्ण कहाणी title=

मुंबई : रोहित शर्माला (Rohit Sharma) टी 20 नंतर वनडे टीमच्या कॅप्टन्सीची (Captaincy) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहितला विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी कर्णधार करण्यात आलं. निवड समिती आणि बीसीसीआयने (BCCI) एकमताने हा निर्णय घेतला. बीससीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) विराटला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Bcci president sourav ganguly reaction on rohit sharma virat kohli odi captaincy issue)

गांगुली काय म्हणाला? 

विराटला कॅप्टनपदावरून हटवल्यानंतर गांगुलीने पहिल्यांदाच मौन सोडलंय. "हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीनं मिळून घेतलाय. खरं तर बीसीसीआयनं विराटला टी-20 चं कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती केली होती. पण त्याला ते मान्य नव्हते. यानंतर, 2 भिन्न लोक मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचं नेतृत्व करावेत, असं निवड समितीला वाटत नव्हते",असं गांगुली म्हणाला. तो एएनआयसह बोलत होता.

"त्यामुळे विराट कोहली केवळ टेस्ट संघाचं कर्णधारपद, तर रोहित शर्मा टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये संघाच असेल हे निश्चित झालं. अध्यक्ष या नात्यानं वैयक्तिकरित्या विराटशी बोललो" असंही गांगुलीने सांगितलं.

रोहितबाबत काय म्हणाला? 

गांगुलीने नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माबाबतही प्रतिक्रिया दिली. "आम्हाला रोहितच्या कर्णधारपदाच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे. विराट कसोटी संघाचा कर्णधार असेल. टीम इंडियाचं भविष्य हे निश्चिचत चांगल्या हातात आहे, असा आम्हाला विश्वास आहे. रोहितला मर्यादित षटकांच्या प्रकारासाठी त्याला शुभेच्छा देतो", असंही गांगुली म्हणाला.