पाकिस्तानच्या दिग्गज स्पिनरच्या मुलाचा देशात 'अपमान', आता खेळणार ऑस्ट्रेलियाकडून?

पाकिस्तानी निवड समितीकडून सतत उपेक्षा होत असलेला पाकिस्तानचे महान गोलंदाज अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान कादिर वर्ल्ड कप टी-20, 2020मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा विचार करतोय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Feb 23, 2018, 09:19 AM IST
पाकिस्तानच्या दिग्गज स्पिनरच्या मुलाचा देशात 'अपमान', आता खेळणार ऑस्ट्रेलियाकडून? title=

मुंबई : पाकिस्तानी निवड समितीकडून सतत उपेक्षा होत असलेला पाकिस्तानचे महान गोलंदाज अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान कादिर वर्ल्ड कप टी-20, 2020मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा विचार करतोय.

निवड समितीकडून वारंवार उपेक्षा

पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात निवड न झाल्याने उस्मान ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेण्याचा विचार करतोय. तसेच त्याला ऑस्ट्रेलियाकडून खेळायचे आहे. २४ वर्षीय उस्मानला ऑस्ट्रेलियाच्या संघातून लेग स्पिनर म्हणून खेळायचे आहे. यासाठी तो चांगली तयारीही करतोय.

उस्मान म्हणाला, त्याला २०१२मध्ये अंडर १९ वर्ल्डकपदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या नागरिकत्वाची ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी मी वडिलांच्या सल्ल्यानंतर ही ऑफर स्वीकारली नव्हती. यावर उस्मानचे वडिल म्हणाले, अंडर-19 मध्ये उस्मानची कामगिरी चांगली राहिलीये आणि पाकिस्तानात त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मी पाकिस्तानात गेलो मात्र तेथे वारंवार उपेक्षाच पदरात पडली. 

उस्मान पुढे म्हणाला, मी ऑस्ट्रेलियाला परत जाणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितल्यानंतर त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी माझी निवड केली. मात्र २०१३मध्ये जेव्हा संघ वेस्ट इंडिजला रवाना होणार होता तेव्हा माझे नाव हटवण्यात आले. माझ्या निवडीची समस्या इथेच संपलेली नाही. मला सतत अपमान सहन करावे लागले. 

माझे लक्ष्य साफ आहे. मला टी-२० वर्ल्डकप २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळायचे आहे. मला स्वत:ला सिद्ध करायचे आहे. असेही उस्मान म्हणाला.