India vs West Indies ODI Series : वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका1-0 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. यातले पहिले दोन सामने बारबाडोसमध्ये तर तिसरा एकदिवसीय सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी म्हणजे 27 जुलैला खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्यााला सुरुवात होईल. पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडिआचा नव्या जर्सीतला एक व्हिडिओ बीसीसीआयने ट्विट केला आहे.
रोहित-विराट बाहेर?
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओवरुन रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एकदिवसीय मालिकेतून बसवलं जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे. एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच झाली आहे. या नव्या जर्सात टीम इंडियातल्या खेळाडूंनी फोटोशूट केलं. यात सूर्यकुमार यादव, यजुवेंद्र चहल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, ऋतुराज गायकवाड, उमरान मलिक, मुकेश कुमार, अक्षर पटेल, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव असे एकदिवसीय संघातील जवळपास सर्व खेळाडू या फोटोशूटमध्ये आहेत. फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहली या फोटोशूटमध्ये कुठेही दिसत नाहीएत.
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे रोहित आणि विराटला एकदिवसीय मालिकेतून आराम दिला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या मालिकेनंतर लगेचच म्हणजे 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. हा स्पर्धा यावेळी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवली जाणारआहे.शिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही रंगणार आहे. त्यामुळे या स्पर्धांसाठी खेळाडूंची चाचणी घेण्यासाठी विंडिजविरुद्धीच एकदविसीय मालिका महत्वाची ठरणार आहे.
Test Cricket
On to the ODIs #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/2jcx0s4Pfw
— BCCI (@BCCI) July 26, 2023
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार
वेस्ट इंडिजचा एकदिवसीय संघ
शाई होप (कर्णधार), रोवमॅन पॉवेल, एलिक अथानाजे, यानिक कारिया, कीसी कार्टी, डोमिनिक ड्रेक्स, शिमरोन हेटमायेार, अलजारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काइल मायर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिनक्लेयर, ओशाने थॉमस