मुंबई : सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात काय करतात, हे प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडतं. ज्यामुळे हल्ली सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि ते आपल्या चाहत्यांना त्यांच्या सोशल मीडीया अकाउंटवरती माहिती देत असतात. क्रिकेटपटूची देखील मैदानाबाहेर वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा होते. भारताचा सलामीवीर शिखर धवनचा नुकताच त्याच्या पत्नीपासून घटस्फोट झाला, त्यानंतर तो चर्चेत आला, ज्यानंतर त्याच्या आयुष्याच नक्की काय घडतंय, हे चाहाते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.
ज्यानंतर आणखी एक क्रिकेटर आता चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्याने घटस्फोट घेण्यासाठी आपल्या बायकोला चक्क 300 कोटी रुपये दिली. हा क्रिकेटर आहे विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क.
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅप्टन क्लार्कचं लग्न 2012 मध्ये झालं. जवळ-जवळ 7 वर्ष एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाले. त्यांनी हा निर्णय स्वत:च घेतला, यासाठी ते कोर्टापर्यंत गेले नाहीत. या दोघांना केल्सी ली नावाची मुलगी आहे.
2018 मायकेल क्लार्कचे त्याच्या असिस्टंटसोबत अफेअर असल्याची बातमी आली होती. एवढेच नाही तर, त्याचे प्रायव्हेट फोटो देखील व्हायरल झाले आहे.
या फोटोमध्ये ते दोघेही एका आलिशान यॉटमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर क्लार्कच्या संसारात वादळ आले. परंतु क्लार्कने त्यावेळी त्याच्या सहाय्यकासोबतच्या संबंधाबाबत कोणतेही वक्तव्य केलं नाही.
ज्यानंतर अचानक क्लार्कच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियन मीडियाने सांगितले होते की, या घटस्फोटाची किंमत 40 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 300 कोटी आहे. मीडियाशी बोलताना मायकेल क्लार्क म्हणाला, 'काही काळ वेगळे राहिल्यानंतर आम्ही हा कठीण निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि आम्ही ठरवले आहे की, वेगळे होणे हेच आपल्या दोघांच्या हिताचे आहे.'
क्लार्कने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 2015 विश्वचषकात नेले होते. मायकेल क्लार्कने आपल्या देशासाठी 115 कसोटी, 245 एकदिवसीय आणि 34 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या बॅटने कसोटी क्रिकेटमध्ये 8643 धावा केल्या तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने सुमारे 8000 धावा केल्या आहेत.