नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळालेय. संजिता चानू हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक पदकावलेय.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली झाले आहे. संजिता चानूने भारतात दुसरं सुवर्णपदक मिळवून दिले आहे. १९२ किलो वजन उचलत संजिताने पदक आपल्या नावावर केले. याआधीच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही संजिता चानूने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते.
#CommonwealthGames: India's Sanjita Chanu wins gold medal in 53 kg women's weightlifting pic.twitter.com/YqdwFol4W7
— ANI (@ANI) April 6, 2018
काल मीराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. ४८ वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक होते. आता त्यात संजिताने भर टाकलेय.