FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची जगभरातील क्रीडारसिक आतुरतेने वाट पाहात आहेत. या स्पर्धेत 32 संघ सहभागी होणार आहेत. त्यात 6 संघ आशियातील आहेत. कतारमधील आठ मैदानांवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. लियोनल मेसी, ख्रिस्तियाने रोनाल्डो आणि नेमार ज्युनियर हे स्टार खेळाडूंकडे संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष लागून आहे. या खेळाडूंचे लाखो चाहते भारतातही आहेत. मेसी आणि रोनाल्डोचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. वर्ल्डकपमुळे फुटबॉल लीग सामने स्थगित झाले आहेत. यूरोपमधील टॉप 5 लीगने स्पर्धेचं आयोजन रोखलं आहे. असं असताना क्रीडा रसिकांना फीफा वर्ल्डकपमध्ये खेळणारे खेळाडू किती फी घेतात याची उत्सुकता लागली आहे.
फीफा वर्ल्डकपमध्ये टॉप 5 संघात खेळणाऱ्या खेळाडूंची तुलना टी 20 वर्ल्डकपशी केली तर फारसं अंतर नाही. भारतीय संघाचे खेळाडू जवळपास त्यांच्या इतकी फी घेतात, असं दिसून येईल. दुसरीकडे, मॅनेजमेंट खेळाडूंना करारानुसार सामना फी देत असते. ही पॉलिसी क्रिकेट आणि फुटबॉलसाठी एकसारखी असते.एकंदरीत तुलना केली तर टी 20 वर्ल्डकप खेळणारे खेळाडू जास्त फी घेतात असं दिसून येईल.
फुटबॉल वर्ल्डकप टीम | फुटबॉल प्लेअर्स इतकी फी घेतात | टी 20 वर्ल्डकप क्रिकेट टीम | टी20 खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची फी |
ब्राझील | जवळपास 4.85 लाख रुपये | भारत | 3 लाख रुपये |
जर्मनी | जवळपास 2.65 लाख रुपये | ऑस्ट्रेलिया | 4.44 लाख रुपये |
फ्रान्स | जवळपास 3.31 लाख रुपये | इंग्लंड | 5.1 लाख रुपये |
इंग्लंड | जवळपास 2.48 लाख रुपये | न्यूझीलंड | 2 लाख रुपये |
स्पेन | जवळपास 2.90 लाख रुपये | पाकिस्तान | 1.38 लाख रुपये |
FIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय
बायर्न म्यूनिख या क्लबमधील 17, बार्सिलोना या क्लबमधील 16, मॅनचेस्टर सिटी क्लबमधील 15, मॅनचेस्टर यूनाइटेड क्लबचे 14 आणि रियल मॅड्रिड क्लबचे 13 खेळाडू विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत.