MI vs PBKS DRS Controversy: आयपीएलच्या यंदाच्या लीगमध्ये 33 वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यात मुंबईचा 9 रन्सने विजय झाला. मात्र या सामन्यानंतर आता मुंबई इंडियन्सवर फिक्सिंगचा आरोप करण्यात येतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध वानखेडेवर झालेल्या सामन्यात कथिच टॉस फिक्सिंग आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या टीमवर फिक्सिंगचा आरोप करण्यात येतोय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात.
पंजाब विरूद्धच्या सामन्यात एक अशी एक घटना घडली, जी पाहून अनेकांनी मुंबईच्या टीमवर ‘फिक्सिंगचे’ आरोप केले आहेत. यावेळी सामन्यात डीआरएसबाबत विरोधी टीम पंजाब किंग्जच्या कर्णधाराचंही ऐकलं नाही. आता या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात मुंबईच्या टीमने प्रथम फलंदाजी केली होती. मुंबईच्या फलंदाजीत 15 व्या ओव्हरमधील शेवटचा बॉल वाइड देण्यात आला. त्यावेळी टीमला डगआऊटमधून रिव्ह्यू घेण्याचे संकेत मिळाले. या संपूर्ण घटनेच्या व्हिडीओ व्हायरल झाल्याने बाब समोर आली आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून आलं की, अर्शदीपने सूर्यकुमार यादवला वाइड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. हा ओव्हरचा शेवटचा बॉल होता तेव्हा मुंबईच्या डगआऊटमध्ये बसलेल्या टीम डेव्हिडने रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
ओव्हरचा शेवटचा बॉल टाकून झाल्यानंतर डेव्हिडने केलेले इशारे कॅमेरात कैद झाले. यावेळी डेव्हिड दोनदा वेळा रिव्ह्यू घेण्यासाठी सांगितल्याचं दिसून येतंय. डेव्हिडचे हावभाव पाहून पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने अंपायरला याची माहिती दिली मात्र अंपायरने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. यानंतर, मुंबईच्या बाजूने वाइड बॉलसाठी रिव्ह्यू घेतला गेला आणि नंतर फील्ड अंपायर निर्णय बदलून त्या बॉलला वाइड बॉल घोषित केलं.
Here's another DRS incident to note during the MI inning.
1. Arshdeep bowled a ball to Surya.
2. Umpire didn't react.
3. MI head coach gestured to batters that it's wide.
4. Batters avoided, but he made another gesture.
5. Sam was angry.
6. Sam complained to the umpire.
7.… pic.twitter.com/NdcYxXYgBK— Vipin Tiwari (@Vipintiwari952_) April 18, 2024
मुंबई इंडियन्स प्लेऑफ गाठणार का असा सवाल चाहत्यांच्या मनात आहे. मुंबई इंडियन्सने सात सामने खेळले असून अजून सात सामने बाकी आहेत. मुंबईला टेबल टॉपर राजस्थानविरुद्ध एक, तर दिल्ली आणि हैदराबादविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळायचा आहे. त्यामुळे आता मुंबईला जर विजय हवा असेल तर आगामी 7 सामन्यात कमीतकमी 5 सामने जिंकावे लागणार आहे. उर्वरित 7 सामन्यांपैकी 4 सामने मुंबईसाठी अवघड असतील.