Yuvraj Singh: रोनाल्डोला‌ रडताना पाहून युवराज झाला भावूक; ट्विट करत म्हणाला...

Yuvraj singh Tweet for Cristiano Ronaldo: युवराज सिंह आज आपला वाढदिवस साजरा (Happy Birthday Yuvraj Singh) करत आहे. मात्र, त्याने मोरोक्को आणि पोर्तुगाल (Morocco vs Portugal) सामन्यानंतरची पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

Updated: Dec 12, 2022, 12:43 AM IST
Yuvraj Singh: रोनाल्डोला‌ रडताना पाहून युवराज झाला भावूक; ट्विट करत म्हणाला... title=
Cristiano Ronaldo, Yuvraj Singh

Cristiano Ronaldo, Yuvraj Singh: मोरोक्को आणि पोर्तुगाल (Morocco vs Portugal) यांच्या झालेल्या रोमांचक सामन्यात अखेर मोरोक्कोने पोर्तुगालचा पत्ता कट केला. मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव करून त्यांना वर्ल्ड कपमधून (FIFA World Cup) बाहेर काढलं. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगलं आहे. यानंतर मोरोक्कोने विजयाचा आनंदोत्सव थाटामाटात साजरा केला. मात्र, दुसऱ्या बाजूला रोनाल्डो रडताना दिसून आला. (yuvraj singh feels sorry heartbreaking see cry cristiano ronaldo portugal crash fifa world cup marathi news)

रोनाल्डोला भावूक (Cristiano Ronaldo emotional) झाल्याचं पाहून मोरोक्कोचे खेळाडू देखील नाराज झाले. रोनाल्डोचा चेहरा पाहून अनेकांच्या डोळ्याच पाणी आल्याचं दिसून आलं. त्यातील एक नाव म्हणजे टीम इंडियाचा (Team India) माजी स्टार क्रिकेटर युवराज सिंह. युवराज सिंह आज आपला वाढदिवस साजरा (Happy Birthday Yuvraj Singh) करत आहे. मात्र, त्याने मोरोक्को आणि पोर्तुगाल (Morocco vs Portugal) सामन्यानंतरची पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

काय म्हणाला Yuvraj Singh?

सॉरी सीआर 7... तुला रडताना पाहून मन नाराज झालं.‌ ब्राझीलनंतर आणखी एक उलटफेर पहायला मिळतोय, पोर्तुगाल बाहेर पडलाय. मोरोक्को संघाचे अभिनंदन, असं युवराज सिंह ट्विट (Yuvraj Singh Tweet) करत म्हणाला आहे.

आणखी वाचा - Karun Nair: 'मला फक्त एक संधी द्या...'; ट्रिपल सेंच्यूरी झळकावणाऱ्या करूण नायरची खदखद!

दरम्यान, कतारमधला फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup 2022) आता अंतिम टप्प्यात आहेत. क्वार्टर फायनलचे सामने संपले आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) संघ पोर्तूगाल क्वार्टर फायनलमध्ये पराभूत होऊन स्पर्धेतून बाद झाला. त्यानंतर आता फिफा प्रेमींच्या उत्सुकता आणखीन वाढल्याचं पहायला मिळतंय.