IND vs ENG: पावसाने व्यत्यय आणल्यास किती ओव्हर्सचा होणार खेळ? पाहा भारत-इंग्लंड सेमीफायनलचं संपूर्ण समीकरण

T20 World Cup 2024 IND vs ENG: दुसरी सेमीफायनल गयानामध्ये होणार असून आयसीसीने या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवला आहे. त्यामुळे या सामन्यात जर पावसाने अधिक वेळ व्यत्यय आणला तर ओव्हर्सच्या कपातीबाबतचे नियमही स्पष्ट करण्यात आले आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Jun 27, 2024, 05:05 PM IST
IND vs ENG: पावसाने व्यत्यय आणल्यास किती ओव्हर्सचा होणार खेळ? पाहा भारत-इंग्लंड सेमीफायनलचं संपूर्ण समीकरण title=

T20 World Cup 2024 IND vs ENG: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काही तासांत टी-20 वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात झाली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून थेट अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यासाठी रिझर्व्ह दिवस ठेवण्यात आला होता. भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला नाही. जर पाऊस पडला तर सामन्यादरम्यान अडचणी येऊ शकतात. 

आयसीसीने ठेवलाय अतिरीक्त वेळ

दुसरी सेमीफायनल गयानामध्ये होणार असून आयसीसीने या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवला आहे. त्यामुळे या सामन्यात जर पावसाने अधिक वेळ व्यत्यय आणला तर ओव्हर्सच्या कपातीबाबतचे नियमही स्पष्ट करण्यात आले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गयानामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान टॉसपूर्वी पाऊस पडल्यास सामना लांबणीवर पडू शकतो. दुसरीकडे महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. सेमीफायनल आणि फायनल मॅचमध्ये फक्त केवळ एका दिवसाचं अंतर आहे. या कारणास्तव यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही.

किती ओव्हर्सची होणार कपात?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलच्या सामन्यात बराच अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. याशिवाय जर सतत पाऊस पडत असेल आणि तो थांबला नाही तर 12.10 वाजल्यानंतर ओव्हर्समध्ये कपात करण्यास सुरुवात होणार आहे. 

कसा असेल कटऑफ टाइम?

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाऊस पडल्यास 10-10 ओव्हर्सचा सामनाही खेळवला जाण्याची शक्यता आहे. यासाठी रात्री 01.44 वाजता कट ऑफची वेळ निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय अनेक प्रकारचे नियमही घालून दिले आहेत. पावसामुळे भारत-इंग्लंड सामना रद्द झाला, तर त्याचा फायदा रोहित शर्माच्या संघाला होणार आहे. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल आणि इथे त्याचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. खरेतर, दुसरा उपांत्य फेरीचा सामना रद्द झाल्यास पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असलेल्या टीमला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे.

कशी असून शकते इंग्लंडविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव / युझवेंद्र चहल