दुबई : आयसीसीने अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दोन ग्रृपची घोषणा केली आहे. आयसीसीने त्यानुसार या दोन ग्रृपमधील प्रत्येक गटात एकूण 6 संघाचा समावेश केला आहे. त्यानुसार टीम इंडिया आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानचा एकाच ग्रृपमध्ये समावेश करण्यात आलाय. दोन्ही संघ बी ग्रृपमध्ये आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. (ICC T20 World Cup 2021 india and pakistan Boths team are b group)
The Men's #T20WorldCup 2021 groups are out
The top two teams from each group will progress to the Super 12.
Who are your picks?
https://t.co/T9510AGiDS pic.twitter.com/GoJ2QcctXE
— T20 World Cup (@T20WorldCup) July 16, 2021
टी 20 वर्ल्ड कपमधील उभयसंघांची कामगिरी
दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 5 वेळा आमनसामने भिडले आहेत. या 5 ही वेळेस टीम इंडिया पाकिस्तावर वरचढ राहिली आहे. भारताने पाकिस्तानचा पाचही सामन्यात पराभव केला होता. टी 20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना हे दोन्ही 14 सप्टेंबर 2007 ला भिडले होते. हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर बॉल आऊट द्वारे सामना निकाली काढण्यात आला. या बॉलआऊटमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं.
अखेरचा सामना कधी?
दोन्ही संघ अखेरीस टी 20 वर्ल्ड कपमध्ये 19 मार्च 2016 मध्ये आमनेसामने आले होते. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं.
4 मैदानांवर स्पर्धेचं आयोजन
आयसीसीने 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हे कोरोनामुळे भारताऐवजी दुबई आणि ओमानमध्ये केलं आहे. स्पर्धेतील सर्व सामन्यांचे आयोजन हे एकूण 4 मैदानांमध्ये केलं आहे. यामध्ये दुबईतील 3 तर ओमानमधील 1 स्टेडियमचा समावेश आहे. यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, शेख झायेद स्टेडिमय, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी ग्राउंडवर हे सामने पार पडणार आहे.