IND vs NZ: पंतला पुन्हा संधी मिळणार? कोण इन कोण आऊट? वसीम जाफर म्हणतात...

India vs New Zealand: दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) कर्णधार शिखर धवनला मोठा सल्ला दिला आहे. 

Updated: Nov 26, 2022, 11:44 PM IST
IND vs NZ: पंतला पुन्हा संधी मिळणार? कोण इन कोण आऊट? वसीम जाफर म्हणतात... title=
ind vs nz 2nd odi wasim jaffer

India vs New Zealand 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळलेली गेलेली टी-ट्वेंटी मालिका खिश्यात घातल्यानंतर आता आगामी वनडे सामना जिंकून मालिकेत अस्तित्व टिकवण्याचं आव्हान भारतापुढे आहे. उद्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा वनडे (India vs New Zealand 2nd ODI) सामना खेळला जाणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर आता उर्वरित सामने जिंकण्यासाठी टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. (ind vs nz 2nd odi wasim jaffer want kuldeep yadav deepak chahar in team replace chahal arshdeep singh marathi news)

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या (IND vs NZ) एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) कर्णधार शिखर धवनला मोठा सल्ला दिला आहे. 

काय म्हणाले वसीम जाफर?

दुसऱ्या वनडे सामन्यात यजुवेंद्र चहलच्या (Yuzi Chahal) जागी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी मिळण्याची शक्यता आहे, कारण तो मिस्ट्री स्पिनर आहे. तसेच, आपण अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) जागी दीपक चहरला (Deepak Chahar) संघात स्थान मिळू शकतं. कारण तो बॉटिंग आणि स्विंग बॉलिंग देखील करू शकतो, असं वसीम जाफर म्हणाले आहेत.

आणखी वाचा - Glenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात "या खेळाडूला कॅप्टन करा"

दरम्यान, यजुवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांना न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. तर दुसरीकडे रिषभ पंतला (Rishabh Pant) देखील चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) रणनितीवर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.