India vs New Zealand 1st ODI: भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात टी-20 नंतर आता वनडे सामन्यांची (ODI Series) सिरीज रंगणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) देण्यात आलं आलं आहे. मात्र सिरीजच्या पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार शिखर धवनसमोर एक मोठं आव्हान आहे. हे आव्हान म्हणजे चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीचं. चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी 3 दावेदार आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
टी-20 वर्ल्डकपमध्ये नंबर 4 साठी फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने आतापर्यंत अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. याशिवाय टी-20 सामन्यात नंबर 3 वर फलंदाजी करताना शतकही ठोकलंय. मात्र फलंदाजीसाठी त्याची फेवरेट जागा ही चौथी आहे. त्याने 13 वनडे सामन्यात 340 रन्स केले आहे. तर 42 टी 20 सामन्यांमध्ये 1408 रन्स केले आहेत.
गेल्या काळामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये चांगला खेळ केला. त्यामुळे चौथ्या क्रमाकांवर खेळण्यासाठी त्याचंही नाव चर्चेत आहे. त्याने त्याच्या फलंदाजीने आतापर्यंत अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याने भारतासाठी 33 टी-20 सामन्यांमध्ये 1299 रन्स केले आहेत. शिवाय यामध्ये 2 शतकांचाही समावेश करण्यात आलाय.
दीपक हुड्डा (Deepak Hooda) देखील या पर्यायासाठी योग्य फलंदाज आहे. त्याने केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाज म्हणून देखील तो योग्य खेळ करतो. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 2.5 ओव्हरमध्ये 10 रन्स देऊन 4 विकेट्सही काढले होते. त्याने आतापर्यंत 8 वनडे सामन्यांमध्ये 141 रन्स केले आहेत.