पर्थ : टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्ध सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा युवा बॉलर अर्शदिप सिंह (Arshadeep Singh) याने पहिल्याच वर्ल्ड कपच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची विकेट घेतली आहे. या विकेटसह अर्शदिप सिंहने शानदार सुरुवात केली आहे. तसेच त्याने दुसऱ्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानला दुसरा धक्का दिला आहे.
हे ही वाचा : दिनेश कार्तिक की ऋषभ पंत? प्लेइंग XI मध्ये कोणाला मिळाली संधी?
भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) टीम इंडियाला झोकात सुरुवात करुन दिली. भुवीने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली, तीही वाईडच्या रुपाने. पहिल्या ओव्हरमध्ये धावा न मिळाल्याने पाकिस्तानची ओपनिंग जोडी काहीशी दबावात होती. मात्र याच दबावाचा फायदा अर्शदीपने (Arshadeep Singh) घेतला. अर्शदीपने अफलातून बॉल टाकत बाबरला एलबीडबल्यू आऊट केलं. अंपायर्सनी दिलेल्या या निर्णयाला पाकिस्तानने आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानला रिव्हीव्यू गमवावा लागला.
अर्शदिप सिंहने (Arshadeep Singh) वर्ल्ड कपच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मोठी विकेट घेतली.या विकेटसह अर्शदिप सिंहने वर्ल्ड कपमध्ये चांगली सुरूवात केली आहे. तसेच अर्शदिपने त्याच्या कोट्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. अर्शदिप सिंहने अनुभवी बॅटसमन मोहम्मद रिझवानला कॅच आऊट केले आहे. या दोन विकेटनंतर पाकिस्तान बॅकफुटला गेला आहे.
अर्शदिपने (Arshadeep Singh) रोहित शर्माचा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्याचा निर्णय खरा करून दाखवला आहे.
दरम्यान हाच अर्शदिप (Arshadeep Singh) आशिया कपमध्ये विलन ठरला होता. कारण त्याने आशिया कपमध्ये पाकिस्तान विरूद्ध सामन्यात कॅच सोडली आहे. या घटनेनंतर त्याला खलिस्तानी आणि गद्दार म्हणत ट्रोल करण्यात आले होते. अर्शदिपच्या विकिपिडीयामध्ये खलिस्तानी असा उल्लेख करण्यात आला होता.या घटनेनंतर प्रकरण चांगलेच तापले होते.
खलिस्तानी आणि गद्दार म्हणणाऱ्या या सर्व ट्रोलर्सना त्याने वर्ल्ड कपचा पहिलाच बॉल टाकून विकेट घेत समाचार घेतला आहे. तसेच दुसऱ्याच ओव्हरमध्ये त्याने दुसरी मोठी विकेट देखील घेतली. या विकेटस घेत अर्शदिपने (Arshadeep Singh) ट्रोलर्सना करारा जवाब दिला होता.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.