IND vs SL 2ND T20I | श्रेयस अय्यरची धमाकेदार खेळी, टीम इंडियचा 7 विकेट्सने शानदार विजय

टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 2ND T20I)  7 शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे.   

Updated: Feb 26, 2022, 10:49 PM IST
IND vs SL 2ND T20I | श्रेयस अय्यरची धमाकेदार खेळी, टीम इंडियचा 7 विकेट्सने शानदार विजय  title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

धर्मशाळा : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात (Ind vs SL 2nd T 20I) श्रीलंकेवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी  184 धावांचे आव्हान दिले होते.  टीम इंडियाने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17 चेंडूंआधी पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा सलग 11 वा विजय ठरला. मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या विजयाचा हिरो ठरला.  (ind vs sl 2nd t 20i team india beat sri lanka by 7 wickets and win series shreyas iyer ravindra jadeja and sanju samson shine at dharamsala)

श्रेयसने सर्वाधिक 74 धावांची नाबाद खेळी केली. तर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) नॉट आऊट 45 धावा चोपल्या. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली. रोहितसेनेने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

श्रेयसने 44 चेंडूत 6 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 74 धावांची खेळी केली. तर जाडेजाने नॉट आऊट 45 धावांमध्ये 7 फोर आणि 1 सिक्स खेचला. 

संजू सॅमसनने 25 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्सने 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ईशान किशनने 16 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार रोहित शर्मा 1 धाव करुन तंबूत परतला. 

श्रीलंकेकडून लहिरु कुमाराने 2 विकेट्स घेतल्या. तर दुश्मंथा चमिराने 1 बळी मिळवला. दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी 20 सामना हा 27 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. 

टीम इंडियाचा हा सामना जिंकून पुन्हा एकदा क्लीन प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल. तर श्रीलंकेचा ही मॅच जिंकून लाज राखण्याचा प्रयत्न असेल. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जाडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल. 

श्रीलंकेची सेना : पाठुम निसांका, कामिल मिश्रा, चरित असलंका, दनुष्का गुनाथिलका, दिनेश चंदीमल (विकेटकीपर), दासुन शनाका (कॅप्टन), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, बिनुरा फर्नांडो आणि लाहिरू कुमारा.