Ind vs SL Test | अरेरे! वाढदिवशीच टीम इंडियातून हा स्टार खेळाडू बाहेर

टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान आणि घातक गोलंदाज टीम इंडियातून बाहेर पडला आहे.   

Updated: Mar 13, 2022, 03:19 PM IST
Ind vs SL Test | अरेरे! वाढदिवशीच टीम इंडियातून हा स्टार खेळाडू बाहेर title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

मुंबई : बंगळुरुत टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL 2nd Test) यांच्यात दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र कॅप्टन रोहितने एकमेव बदल केला. यामुळे बेंचवर असलेल्या खेळाडूंना संधी मिळालीच नाही. दरम्यान आता टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान आणि घातक गोलंदाज टीम इंडियातून बाहेर पडला आहे. (ind vs sl 2nd test bcci released from bio bubble to team india faster bowler mohammed siraj) 

विराट कोहलीच्या मर्जीतला समजला जाणारा मोहम्मद सिराजला (mohammed siraj)  बीसीसीआयने (Bcci) या मालिकेतून मुक्त केलंय. काही मीडिया रिपोर्टनुसार, सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच सिराज बायो-बबलच्या (Bio Bubbule) बाहेर पडला आहे. सिराजला या कसोटी मालिकेसाठी 16 सदस्यीय संघात निवड करण्यात आली. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

बीसीआयने रिलीज केल्याने सिराज आयपीएलच्या आधी कुटुंबियांसोबत काही दिवस राहता येणार आहे. यानंतर सिराज आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमासाठी बंगळुरु टीमसोबत जोडला जाणार आहे.

आरसीबीची पाहिला सामना कधी?

आरसीबी (RCB) या 15 व्या मोसमातील पहिला सामना हा 27 मार्चला पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध खेळणार आहे. 

तसेच आता या मोसमापासून आरसीबीच्या नेतृत्वाची जबाबदारी ही दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळलेल्या फॅफ डु प्लेसिसला देण्यात आली आहे. त्यामुळे फॅफ या मोसमात आरसीबीला पहिली ट्रॉफी जिंकून देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.