भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये दाखल, पाहा दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये पोहोचली आहे.

Updated: Jan 21, 2020, 07:48 PM IST
भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये दाखल, पाहा दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक title=

ऑकलंड : भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये पोहोचली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. भारतीय टीम पहिल्यांदाच ५ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे. याचवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमुळे ही टी-२० सीरिज महत्त्वाची मानली जात आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा हा ४० दिवसांचा आहे. वनडे सीरिज संपल्यानंतर आणि टेस्ट सीरिज सुरु व्हायच्या आधी भारतीय टीम ३ दिवसांचा सराव सामनाही खेळणार आहे. २४ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धची टी-२० सीरिज सुरु होणार आहे.

टी-२० सीरिजमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत १२ टी-२० मॅच झाल्या आहेत. यातल्या ८ मॅचमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला, तर भारताला फक्त ३ मॅच जिंकता आल्या आहेत. या दोन्ही टीममधली एक मॅच रद्द झाली होती.

न्यूझीलंड दौऱ्यामध्ये टी-२० मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता, वनडे मॅच सकाळी ७.३० वाजता आणि टेस्ट मॅच पहाटे ४ वाजता सुरु होतील. न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या टी-२० टीमची घोषणा करण्यात आली आहे, मात्र अजूनही वनडे आणि टेस्ट टीम जाहीर करण्यात आलेली नाही. टी-२० सीरिजसाठी शिखर धवनची निवड झाली होती, पण दुखापतीमुळे धवन न्यूझीलंडला जाऊ शकला नाही. धवनच्या बदली खेळाडूची निवडही अजून झालेली नाही.

भारतीय टी-२० टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव

टी-२० सीरिज 

२४ जानेवारी- पहिली टी-२०- इडन पार्क, ऑकलंड

२६ जानेवारी- दुसरी टी-२०- इडन पार्क, ऑकलंड

२९ जानेवारी- तिसरी टी-२०- सिडन पार्क, हॅमिल्टन

३१ जानेवारी- चौथी टी-२०- वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन 

२ फेब्रुवारी- पाचवी टी-२०- बे ओव्हल, माऊंट मांगनुई

वनडे सीरिज 

५ फेब्रुवारी- पहिली वनडे- सिडन पार्क, हॅमिल्टन

८ फेब्रुवारी- दुसरी वनडे- इडन पार्कस ऑकलंड

११ फेब्रुवारी- तिसरी वनडे- बे ओव्हल, माऊंट मांगनुई

१४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी- सराव सामना- न्यूझीलंड-११ विरुद्ध भारत

टेस्ट सीरिज 

२१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी- पहिली टेस्ट- बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन

२९ फेब्रुवारी ते ४ मार्च- दुसरी टेस्ट- हेगले ओव्हल, क्राईस्टचर्च