close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

India U-19 : भारताने युथ टेस्ट सीरिज जिंकली

१९ वर्षांखालील भारत आणि श्रीलंका संघाची युथ टेस्ट सीरिज भारताने जिंकली. श्रीलंकेवर भारताने एक डाव आणि १४७ धावांनी मात करत मालिका २-० अशी जिंकली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 27, 2018, 10:45 PM IST
India U-19 : भारताने युथ टेस्ट सीरिज जिंकली
१९ वर्षांखालील युथ टेस्ट सीरिज भारताने जिंकली (@BCCI Photo)

मुंबई : १९ वर्षांखालील भारत आणि श्रीलंका संघाची युथ टेस्ट सीरिज भारताने जिंकली. श्रीलंकेवर भारताने एक डाव आणि १४७ धावांनी मात करत मालिका २-० अशी जिंकली. 

गोलंदाज सिद्धार्थ देसाईच्या डावखुऱ्या फिरकी माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ ढेपाळला. दुसऱ्या डावात देसाईने २० षटकात ४० धावांत ४ बळी घेतले. यतीन मंगवाना आणि आयुष बदोनीने प्रत्येकी दोन बळी टिपले. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने ज्युनिअर पदार्पणाच्या या सामन्यात १ बळी घेतला.