मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची शंभरी

ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं १८ ओव्हरमध्ये १०० रन्सचा टप्पा ओलांडला आहे.

Updated: Sep 28, 2017, 07:03 PM IST
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची शंभरी  title=

बंगळुरू : ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं १८ ओव्हरमध्ये १०० रन्सचा टप्पा ओलांडला आहे. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतानं एक विकेट गमावून १०० रन्सचा टप्पा ओलांडला आहे. अजिंक्य रहाणे ६६ बॉल्समध्ये ५३ रन्स करून आऊट झाला.

चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं ५० ओव्हर्समध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३३४ रन्स बनवल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि ऍरोन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी २३१ रन्सची पार्टनरशीप केली. डेव्हिड वॉर्नरनं त्याच्या १०० व्या वनडेमध्ये शतक झळकावलं आहे.

११९ बॉल्समध्ये १२४ रन्स करून डेव्हिड वॉर्नर आऊट झाला. तर ऍरॉन फिंचनं ९६ बॉलमध्ये ९४ रन्सची खेळी केली. भारताकडून उमेश यादवनं ४ तर केदार जाधवनं एक विकेट घेतली.

या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये पहिल्या तीन वन-डे मॅचेस जिंकत टीम इंडियाने सीरिज आपल्या खिशात घातली आहे. आता चौथी वन-डे मॅच जिंकत टीम इंडिया आपली विजयी घौडदोड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा