मोहालीत टीम इंडियाच्या शानदार विजयाची ५ कारणे

धर्मशालामध्ये झालेल्या वनडे सामन्यात ज्याप्रकारे टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्याने टीम इंडियावर चांगलाच दबाव आला होता. पण मोहालीला येता येता टीम इंडिया आपल्या रंगात पुन्हा रंगली. 

Updated: Dec 13, 2017, 09:29 PM IST
मोहालीत टीम इंडियाच्या शानदार विजयाची ५ कारणे title=

नवी दिल्ली : धर्मशालामध्ये झालेल्या वनडे सामन्यात ज्याप्रकारे टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्याने टीम इंडियावर चांगलाच दबाव आला होता. पण मोहालीला येता येता टीम इंडिया आपल्या रंगात पुन्हा रंगली. 

टीम इंडियाची ताकद असलेली फलंदाज आज पूर्णपणे आपल्या रंगात होते. खासकरून हिटमॅन रोहित शर्मा. वनडेत तो नवा बादशाह बनला आहे. आपल्या करिअरचं तिसरं दुहेरी शतक लगावून त्याने सांगितलं आहे की, तो त्याचा हा रेकॉर्ड कुणाला मोडूही देणार नाही. या विजयात त्याला शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची चांगली साथ मिळाली. 

स्कोरमुळे गोलंदाज बिनधास्त

टीम इंडियाने श्रीलंकेसमोर ३९२ रन्सचे टारगेट दिल्यावर टीमचे गोलंदाज जरा बिनधास्त झाले. गोलंदाजांनीही शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या टीमला स्वस्तात निपटवत मोठा विजय मिळवला. आता या सीरिजचा निर्णय तिस-या वनडेत होईल. 

हिटमॅन रोहित शर्मा जगात सर्वात भारी

या सामन्याचा हिरो रोहित शर्मा होता. पहिल्या सामन्याच्या पराभवाच्या दबावातही त्याने शानदार खेळ केला. सोबतच त्याच्या तिस-या दुहेरी शतकाने क्रिकेटच्या इतिहासात त्याचं नाव फार वर नेऊन ठेवलंय. रोहित तीन दुहेरी शतक लगावणारा एकुलता एक खेळाडू आहे. तर जगभरात दुहेरी शतक लगावणारे केवळ ४ फलंदाज आहेत. तसेच त्याने केवळ ३६ बॉल्समध्ये दुसरं शतक झळकावत हा कारनामा केला. रोहित शर्माने या वर्षी सहावं शतक केलं. त्याशिवाय हा कारनामा सौरव गांगुली याने केला होता. हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने एका वर्षात ९ वनडे शतक लगावले होते. 

शिखर धवने रोहितसोबत केला रेकॉर्ड

पहिल्या सामन्यात अयशस्वी ठरल्यानंतर शिखर धवन या सामन्यात फारच आक्रामक दिसला. जेव्हा रोहित शर्मा हळू फलंदाजी करत होता तेव्हा दुसरीकडून शिखर आक्रामक फलंदाजी करत होता. शिखरने ६७ बॉल्समध्ये ६८ रन्स केले. यात ९ फोरचा समावेश आहे. शिखरने रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी ११५ रन्सची भागीदारी केली. यावर्षी नवव्यांदा भारतीय सलामी फलंदाजांनी शतकीय भागीदारी केली. जगातल्या इतर टीम्सने हा केवळ तीनदा हा कारनामा केलाय. 

दुस-या सामन्यात श्रेयस अय्यरचा धमाका

आपला दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने एकदम योग्य वेळेवर वापसी केली आहे. भलेही तो शतक करण्यापासून थोडक्यात चुकला पण त्याने ७० बॉल्समध्ये ८८ रन्सची शानदार खेळी केली. पहिल्या सामन्यात तो फार चांगला खेळ करू शकला नाही. पण या सामन्यात त्याने कमाल खेळ केला. त्याने रोहितसोबत २१३ रन्सची भागीदारी केली. या भागीदारीने टीमच्या विजयाचा पाया रचला गेला. 

फ्लॅट विकेटवर पुन्हा करिष्मा

टीम इंडियाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, ते सपाट विकेटवर सरताज आहेत. सध्या या विकेटवर टीम इंडियाला मात देणारी जगात कोणतीही टीम नाहीये. पहिल्या सामन्यात विकेटवर गवत असल्याने टीम इंडियाचा लगेच डगमगली. रोहितने शेवटच्या २७ बॉल्समध्ये ३४१ च्या स्ट्राईक रेटने रन केले. त्याने २७ बॉल्समध्ये ९२ रन्स केले. यात ११ सिक्सर आणि ३ फोरचा समावेश आहे. 

श्रीलंकन टीमची बेकार गोलंदाजी

फलंदाजी सोप्या असलेल्या या विकेटवर गोलंदाजी कठिण होती. पण या विकेटवरही चांगली गोलंदाजी केली जाऊ शकते. पण श्रीलंकेचे गोलंदाज यात अयशस्वी राहिले. ज्या गोलंदाजांना धर्माशालामध्ये टीम इंडियाचा नाकी नऊ आणले होते ते इथे पार अयशस्वी ठरले. सुरंगा लकमल सर्वात महागात पड्ला. थिसारा परेराने ८ ओव्हरमध्ये ८० रन्स दिले. नुवान प्रदीपने १० ओव्हरमध्ये १०६ रन्स दिले.