close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

IPL 2019: बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आहे.

Updated: Apr 15, 2019, 08:06 PM IST
IPL 2019: बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

मुंबई : बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. रोहित शर्माने टॉस जिंकून बंगळुरूला पहिले बॅटिंगला बोलावलं आहे. या मॅचमध्ये मुंबईच्या टीमने एक बदल केला आहे. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये फिल्डिंग करत असताना अल्झारी जोसेफला दुखापत झाली होती. जोसेफच्याऐवजी लसिथ मलिंगाचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला होता. आता बंगळुरूविरुद्धचा सामना जिंकून पुन्हा एकदा विजयाची गाडी पटरीवर आणण्याचं आव्हान रोहित शर्माच्या टीमपुढे असणार आहे. तर पहिल्या ६ मॅच गमावल्यानंतर विराट कोहलीच्या बंगळुरूने पंजाबविरुद्धची मॅच जिंकली होती.

आत्तापर्यंत खेळलेल्या ७ मॅचपैकी ४ मॅचमध्ये मुंबईचा विजय तर ३ मॅचमध्ये पराभव झाला आहे. तर बंगळुरूनं आत्तापर्यंत खेळलेल्या ७ मॅचपैकी ६ सामने गमावले असून एका मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आणि बंगळुरूची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, लसिथ मलिंगा, जेसन बेरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह

बंगळुरूची टीम

विराट कोहली (कर्णधार), पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, मार्कस स्टॉयनीस, मोईन अली, अक्षदीप नाथ, पवन नेगी, उमेश यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा