IPL 2021 : मॅच 7.30 वाजता सुरु करण्यावरुन Dhoni चा मोठा आक्षेप, "धोनी म्हणतो हा फायदा फक्त....."

सामना संपल्यानंतर धोनीने असे सांगितले की, मॅचच्या सुरुवातीपासूनच तो खूष नव्हता. 

Updated: Apr 11, 2021, 07:15 PM IST
IPL 2021 : मॅच 7.30 वाजता सुरु करण्यावरुन Dhoni चा मोठा आक्षेप, "धोनी म्हणतो हा फायदा फक्त....."

मुंबई : IPL 2021 च्या पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा दिल्ली कॅपिटलकडून पराभव झाला. सामना संपल्यानंतर धोनीने असे सांगितले की, मॅचच्या सुरुवातीपासूनच तो खूष नव्हता. त्याच्या म्हणण्यानुसार सायंकाळी 07.30 वाजता सामना सुरू झाल्यामुळे प्रथम बॅालींग करणाऱ्या टीमला याचा फायदा होईल. ज्यामुळे त्या संघाला 30 ते 40 मिनिटे मैदान कोरडे मिळते, या गोष्टीमुळे मॅचमध्ये मोठा फरक पडतो.

शनिवारी आयपीएलमध्ये दिल्लीचा नवीन कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅालींग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्ली कॅपिट्ल्स, धोनीच्या सुपर किंग्जला 188 रनांमध्ये थांबवण्यास यशस्वी ठरले.  शिखर धवन ( 85 रन, 54 बॅाल, 10 चौके, 2 सिक्स) आणि पृथ्वी शॉ (72 रन, 38 बॅाल,9 चौके, 3 सिक्स) यांना रोखण्यात दिल्लीचा संघ यशस्वी झाला.

दवं मुळे पडतो फरक

सामन्यानंतर धोनी म्हणाला की, जेव्हा त्याच्या टीमने बॅटींगला सुरुवात केली तेव्हा, बॅटींग करणे थोडेसे अवघड होते, परंतु दवं पडल्यानंतर बॅटींग करणे सोपे झाले. धोनी म्हणाला, "जर तुम्ही प्रथम बॅटींग करत असाल तर तुम्हाला 10-15 रन अधिक करावे लागतील. आता सामने 07.30 वाजता सुरू होत आहेत. याचा अर्थ असा की, विरोधी टीमला अर्धा तास आधी डावाची सुरुवात करावी लागेल. म्हणजेच त्या वेळेला दवं पडलेला नसतो किंवा जमिन कोरडी असते.

याचा अर्थ बॅाल सहजा सहजी बॅटला लागणार नाही आणि जास्त लांब जाणार नाही. परंतु दुसऱ्या वेळेला बॅटींग करायला येणाऱ्या टीमला या दवं चा चांगला फायदा होईल. यासाठी पहिल्या खेळणाऱ्या टीमला 15-20 रन जास्त करावे लागतील, तसेच सुरवातीला एखादा विकेट देखील घ्यावा लागेल."

200 रन्सचे लक्ष्य घेऊन चालने आवश्यक

या परिस्थितीत प्रथम बॅटींग करणाऱ्या टीमला 200 रनांचे लक्ष्य ठेऊन पुढे जावे लागेल आणि सुरवातीचा आर्धा तास प्रथम बॅाटींग करणाऱ्या टीमसाठी महत्वाचे असेल. तेव्हा त्यांनी आधिक रन केले पाहिजेत असा सल्ला धोनीने सर्वच टीमला दिला.

सामने रात्री 8 वाजता सुरू व्हायचे

सुरुवातील संध्याकाळी 8 वाजता आयपीएल सामने सुरू व्हायचे. पण गेल्या वर्षी कोविडमुळे आयपीएल संयुक्त अरब देशात (यूएई) झाला होता आणि याच कारणास्तव सायंकाळी 07.30 वाजता सामने सुरू झाले. त्यामुळे यावर्षी देखील सामने 07.30 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून सामने योग्य वेळी संपू शकतील.