शारजा : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दुसरा क्वालिफायर (Qualifier 2) सामना दिल्ली कॅपिट्ल्स (DC) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळवण्यात आला. हा लो स्कोरिंग सामना रंगतदार झाला. शेवटच्या षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या सामन्यामुळे दिल्लीच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र अखेर राहुल त्रिपाठीने सिक्स खेचत कोलकाताला विजय मिळवून दिला. यासह कोलकाताने आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा धडक मारली. तर दिल्लीचं आव्हान संपुष्टात आलं. (ipl 2021 qualifier 2 dc captain rishabh pant and prithvi shaw got tears in his eyes after lose against kkr)
या चुरशीच्या सामन्यात पराभव झाल्याने दिल्लीचा युवा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) आणि सलामीवीर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) अश्रू अनावर झाले. या दोघांचा भावूक झालेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
भावूक झालेल्याला पंतला रिकी पॉन्टिंगने (ricky ponting) धीर दिला. डगआऊटमध्ये पंत रडताना दिसला. त्याच्यासोबत पॉन्टिंग होता. यांचा फोटो व्हायरल होतोय. तर दुसऱ्या बाजूला पृथ्वीला मैदानातच रडू कोसळलं. सामन्यानंत जेव्हा पंत संवाद साधायला आला. तेव्हाही पंत काहीसा भावूक झालेला दिसून आला.
#KKRvDC #DelhiCapitals #prithvishaw pic.twitter.com/kWYTtQcNGh
— Prabhat Sharma (@PrabS619) October 13, 2021
प्रत्येक कॅप्टनचं आपल्या नेतृत्वात टीमला लोकप्रिय स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. त्यानुसार दिल्लीने या मोसमाच्या सुरुवातीपासून तडाखेदार कामगिरी केली. दिल्लीचं गत मोसमातील विजेतेपदाचं स्वप्न अवघं एक पाऊल दूर राहिलं. हे स्वप्न पंत पूर्ण करेल, अशा विश्वास टीम मॅनेटमेंटला होता.
पंत तो विश्वास सार्थही ठरवत होता. मात्र अखेर क्वालिफायर 2 मध्ये दिल्लीचं स्वप्न भंगलं. "आम्ही पुढच्या वेळेस आणखी जोमाने परतू, असा विश्वास पंतने यावेळेस व्यक्त केला", असं पंतने नमूद केलं. दिल्लीला आपण जिंकवू शकलो नाही, ही खंत पंतच्या बोलण्यातून दिसून येत होती.
असा रंगला सामना
कोलकाताने टॉस जिंकला. दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शिखर धवनने 36 तर श्रेयस अय्यरने नाबाद 30 रन्स केल्या. इतर फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना 20 पेक्षा अधिक धावांचा पुढचा टप्पा गाठता आला नाही.
पृथ्वी शॉ आणि मार्क्स स्टोयनिसने प्रत्येकी 18 धावांची खेळी केली. शिमरॉन हेटमायरने 17 रन्स केल्या. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. त्यामुळे कोलकाताला विजयासाठी 135 धावांचं आव्हान मिळालं.
कोलकाताची बॅटिंग आणि थरार
विजयी धावांचं पाठलाग करण्यासाठी कोलकाताचे सलामीवीर मैदानात आले. कोलकाताच्या शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने अफलातून सुरुवात दिली. या दोघांनी 96 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान व्यंकटेश अय्यरने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र तो अर्धशतकानंतर लवकर बाद झाला. त्याने 55 धावांची खेळी केली.
अय्यरनंतर नितीश राणा मैदानात आला. शुबमन आणि राणा दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 27 धावा जोडल्या. यानंतर राणा कोलकाताचा 123 स्कोअर असताना आऊट झाला. राणाने 13 धावा केल्या.
मात्र यानंतर कोलकाताची घसरण सुरु झाली. कोलकाताने विकेट गमावले. मीडल ऑर्डरमधील बॅट्समनने निराशा केली. दिनेश कार्तिक, कर्णधार इयोन मॉर्गन, शाकिब अल हसन आणि सुनील नारायण हे चौघे शून्यावर आऊट झाले.
त्यामुळे लो स्कोरिंग सामन्यात थरार निर्माण झाला. दिल्लीने यासह सामन्यातील आव्हान कायम ठेवलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक माऱ्याच्या जोरावर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत आणून ठेवला. मात्र राहुल त्रिपाठीने 20 व्या ओव्हरमधील 5 व्या चेंडूवर खणखणीत सिक्स मारत कोलकाताला विजय मिळवून दिला.
कोलकाताची तिसऱ्यांदा धडक
दरम्यान या विजयासह कोलकाताने अंतिम फेरीत धडक मारली. कोलकाताची अंतिम सामन्यात पोहचण्याची ही तिसरी वेळ ठरली. आता 15 ऑक्टोबरला चेन्नई विरुद्ध कोलकाता विजेतेपदासाठी आमनेसामने भिडणार आहेत.