GT vs SRH: मैदानातच हार्दिक पांड्या आणि नेहरामध्ये बाचाबाची; VIDEO तुफान व्हायरल

GT vs SRH IPL 2023: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव करत प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. गुजरातने अत्यंत सहजपणे हा सामना जिंकला. मात्र यावेळी नेहरा (Ashish Nehra) आणि पांड्यामध्ये (Hardik Pandya) वाद झाल्याची चर्चा सुरु आहे. दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

शिवराज यादव | Updated: May 16, 2023, 01:17 PM IST
GT vs SRH: मैदानातच हार्दिक पांड्या आणि नेहरामध्ये बाचाबाची; VIDEO तुफान व्हायरल title=

GT vs SRH IPL 2023: आयपीएलच्या (IPL) या हंगामातही गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) चांगली कामगिरी करत इतर संघांसमोर आव्हान निर्माण केलं आहे. गतविजेता संघ असणाऱ्या गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायजर्स हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) झालेल्या सामन्यात अत्यंत सहजपणे विजय मिळवला आहे. यानंतर प्लेऑफमधील (Playoff) त्यांचं स्थान निश्चित झालं असून, सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पण सोमवारचा सामना आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिला. मैदानातच गुजरातचा प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashsih Nehra) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यात भांडण झालं. त्यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मैदानात तुम्ही आशिष नेहराला कधी रागावताना पाहिलं आहे का? एक खेळाडू म्हणून फार कमी वेळा तुम्हाला ही संधी मिळाली असेल. नेहमी मस्ती मजेत असणारा नेहरा सोमवारी मात्र वेगळ्याच रुपात सर्वांना दिला. नेहमी हसत दिसणारा नेहरा यावेळी संतापलेला होता. मैदानात सीमारेषेवर उभा राहून नेहरा हार्दिक पांड्याला संतापून काहीतरी सांगत होता. 

गुजरातविरोधात खेळताना हैदराबादची स्थिती राजस्थान रॉयल्ससारखी झाली होती. गुजरातने दिलेल्या 189 धावांचं आव्हान पूर्ण करताना हैदराबादची चांगलीच दमछाक झाली. नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात हैदराबादची स्थिती 59 धावांवर 7 विकेट अशी झाली होती. मोहम्मद शामी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी चार विकेट घेतले. Heinrich Klaasen ने 44 चेंडूत 64 धावा केल्याने हैदराबाद संघ 154 धावांवर 9 विकेटपर्यंत पोहोचू शकला. गुजराने 34 धावांनी हा सामना जिंकत प्लेऑफमध्ये स्थान मिळालेला पहिला संघ ठरला आहे. 

मात्र पहिल्या डावादरम्यान नेहरा वैतागला होता. वृद्धिमान साहा पहिल्या ओव्हरला शून्यावर बाद झाल्यानंतर शुभमन गिंल आणि साई सुहरसन यांनी 147 धावांची भागीदारी केली. पण संघ ज्याप्रकारे शेवटच्या टप्प्यात संघर्ष करत होता, ते पाहून नेहरा नाराज होता. शुभमन गिलने शतक ठोकल्यानंतरही हे दिसत होतं. कारण गुजरातचे सर्व खेळाडू त्याचं शतक साजरा करत होते, तेव्हा एकटा नेहरा कोणतेही हावभाव न दाखवता शांत बसला होता. हे पाहून समालोचक आकाश चोप्रा आणि साबा करीम यांनाही आश्चर्य वाटलं होतं. कदाचित त्याची संघाकडून जास्त अपेक्षा आहे असं त्यांनी यावळी म्हटलं. 

गुजरातचा संघ शेवटच्या ओव्हर्समध्ये जास्त धावा करु शकला नाही. हैदराबादने सामन्यात पुनरागमन करत शेवटच्या तीन ओव्हरमध्ये सहा विकेट घेतले. यामधील चार विकेट शेवटच्या ओव्हरमध्ये पडले. यामुळे गुजरातची धावसंख्या 188 वर 9 गडी बाद अशी मर्यादित राहिली. 

फलंदाजांनी खेळलेले शॉट पाहून नेहरा त्यांच्यावर चांगलाच संतापला होता. पहिल्या डावाच्या शेवटी तो हार्दिक पांड्याशी अत्यंत चिडलेल्या पद्दतीने बोलत असल्याचं दिसत आहे. हार्दिक आणि नेहरा दोघेही यावेळी संतापलेले दिसत होते. नेहरा तेथून गेल्यानंतर गुजरातचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी पांड्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. 

दरम्यान फलंदाजी शेवटला ढेपाळली असली तरी गुजरातने सहजपणे हा सामना जिंकला. आता बंगळुरुविरोधातील एकमेव सामना त्यांना खेळायचा आहे. त्यांनी आधीच प्ले-ऑफमध्ये आपली जागा नक्की केली आहे.