IPL 2024: तापामुळे 3 दिवस बेडवर, पेन किलर घेऊन उतरला मैदानात आणि रन्सचा धोधो पाऊस

Rajasthan Royal Riyan Parag: खेळाच्या सलग 3 दिवस आधी रियान परागची तब्येत अजिबात ठीक नव्हती.

Pravin Dabholkar | Updated: Mar 29, 2024, 03:18 PM IST
IPL 2024: तापामुळे 3 दिवस बेडवर, पेन किलर घेऊन उतरला मैदानात आणि रन्सचा धोधो पाऊस title=
Riyan Parag Batting

IPL 2024 Rajasthan Royal Riyan Parag : सध्या आयपीएलचा 17 वा हंगाम सुरु आहे. मुंबई इंडियन्सची टीम सलग 2 सामन्यात हरल्याने फॅन्स नाराज आहेत. तर दुसरीकडे अनेक उभरते खेळाडू आपल्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. रियान परागचे नाव यामध्ये आघाडीवर आहे. दिल्ली कॅपिटल्सवर राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला. युवा बॅट्समन रियान पराग याच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थान रॉयल्सला हा विजय मिळवता आला. दरम्यान खेळाच्या सलग 3 दिवस आधी रियान परागची तब्येत अजिबात ठीक नव्हती. 

आयपीएलमधील आपल्या तडफदार खेळीनंतर परागने आपल्या तब्येतीबद्दल खुलासा केला आहे. मागच्या 3 दिवसांपासून आपली तब्येत ठिक नव्हती, असे त्याने सांगितले. त्याने आयपीएल मॅच सुरु होण्याच्या काही वेळ आधीच पेन किलरसारखी गोळी घेतली होती. औषध घेऊन तो मैदानात खेळायला उतरला.

दिल्लीविरोधात 12 रन्सने विजय

मूळचा आसामचा असलेल्या 22 वर्षीय रियानने 45 बॉल्समध्ये नाबाद 84 रन्स केले. त्याच्या या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सला दिल्लीविरोधात 12 रन्सने विजय मिळवता आला. त्याला मॅचचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली. मी खूप मेहनत घेतली आहे. मागच्या 3 दिवसांपासून मी बेडवर होतो. पेन किलर घेत होतो. आज उठलो आहे आणि मी खूप खूश आहे,असे त्याने सांगितले. 

हुशार ऑलराऊंडर मानला जाणाऱ्या परागकडून साऱ्यांना आशा होत्या. त्याने बहारदार खेळ करुन त्या पूर्ण करुन दाखवल्या. असे असले तरी मागचे काही सिझन त्याच्यासाठी चांगले गेले नव्हते. पण टीमने त्याच्यावर विश्वास ठेवला. यानंतर परागने आयपीएलमध्ये आपला बेस्ट स्कोअर बनवला आणि राजस्थान रॉयल्सला 5 विकेटवर 185 रन्स या स्थितीत नेऊन पोहोचवले. आई येथे आहे. तिने माझा 3-4 वर्षांचा संघर्ष पाहिलाय. तिचे माझ्याबद्दलचे मत मला माहिती आहे. मला शून्य मिळाले तरी ते बदलत नाही, असे त्याने सांगितले. 

बॉल खाली राहून थांबत होता

मागच्या सत्रातही पराग एक फिनिशर म्हणून समोर आला होता. टीम मॅनेजमेंटने त्याला 4 नंबरवर एक संधी देण्याचा प्लान बनवला. देवधर ट्रॉफी आणि सैयद मुश्ताक अली टी 20 मध्ये खूप सारे रन्स बनवल्यानंतर परागने आयपीएलमचे मैदान गाजवले. माझा देशांतर्गत खेळ चांगला राहिला. याचा मला फायदा मिळाल्याचे त्याने सांगितले. टॉप 4 बॅट्समनपैकी कोणला तरी खेळायचं होत. बॉल खाली राहून थांबत होता. परागचा खेळ पाहून कॅप्टन संजू सॅमसन प्रभावित होता. रियान पराग मागच्या काही वर्षात एक मोठं नाव राहिलं आहे. मी जिथे कुठे जातो, तिथे मला लोकं त्याच्याबद्दल विचारत असतात. तो भारतीय क्रिकेटला काही खास देऊ शकतो. 

अधिक चांगल्या खेळाची गरज

राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. आठव्या ओव्हरमध्ये त्यांचा स्कोर 3 विकेट्स आणि 36 रन्स असा होता. पण परागने हळुहळू  आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. तशी सामन्यात रंगत आली आणि टीमला चांगल्या स्कोअरपर्यंत पोहोचवले. ज्याप्रमाणे आमची सुरुवात झाली ते खूपच निराशाजनक होते. आयपीएल बदलत आहे. आणि आम्हाला देखील अधिक चांगला खेळ करावा लागेल, असे सॅमसनने यावेळी सांगितले.