IPLमध्ये टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची पोल खोल, T20 वर्ल्ड कपमध्ये संधी देणे सिलेक्टरची मोठी चूक

त्याला टी -20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियामध्ये जागा देऊन सिलेक्टर्सनी मोठी चूक केली आहे.

Updated: Sep 23, 2021, 12:40 PM IST
IPLमध्ये टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची पोल खोल, T20 वर्ल्ड कपमध्ये संधी देणे सिलेक्टरची मोठी चूक

दुबई : टी -20 वर्ल्ड कप17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे, जिथे सध्या आयपीएल मॅच खेळल्या जात आहे. या मॅचदरम्यान टीम इंडियामधील एका खेळाडूची कामगिरी टी -20 वर्ल्ड कपच्या आधी उघड झाली आहे. बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची खराब कामगिरी दिसून आली. भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.

काल म्हणजेच बुधवारी झालेल्या या मॅचमध्ये हे दिसून आलं की भुवनेश्वर कुमार सध्या खराब फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याला टी -20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियामध्ये जागा देऊन सिलेक्टर्सनी मोठी चूक केली आहे.

IPLमुळे टीम इंडियाच्या खेळाडूची पोल खोल

बुधवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 3 षटकांच्या गोलंदाजीदरम्यान 21 धावा दिल्या. या सामन्यात भुवनेश्वर कुमारला एकही विकेट मिळाली नाही. असे वाटत होते की भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीमुळे एकाही फलंदाजाला कोणतीही अडचण येत नाही आहे. भुवनेश्वर कुमारच्या खराब कामगिरीनंतर, आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, टी -20 वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत अशा गोलंदाजाला संधी देऊन निवडकर्त्यांनी जोखीम कशी घेतली, जो अजिबात फॉर्ममध्ये नाही किंवा त्याला कोणतीही विकेट देखील मिळत नाही.

सिराज आणि नटराजन सारख्या सर्वोत्तम गोलंदाजांवर अन्याय

भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारख्या वेगवान गोलंदाजांची टी -20 वर्ल्ड कपमध्ये निवड झाली आहे. भुवनेश्वर कुमारची IPLमधील कामगिरी पाहता, त्याला टी -20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या संघात स्थान का मिळालं यावर प्रश्न उठत आहेत.

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीत ना वेग आहे आणि ना तो गोलंदाजीने विरोधी फलंदाजांमध्ये भीती निर्माण करू शकतो. अशा परिस्थितीत टी -20 वर्ल्ड कपच्या संघात मोहम्मद सिराज आणि टी नटराजनसारख्या मजबूत आणि फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांची निवड न केल्याने सिलेक्टर्सनी मोठी चूक केली आहे.

भुवनेश्वरचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंताजनक

यूएईमध्ये होणाऱ्या 2021 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जाते. परंतु भुवनेश्वर कुमारचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. ऑक्टोबरमध्ये टी -20 वर्ल्ड कप खेळला जाणार असल्याने भुवनेश्वर कुमारची खराब कामगिरी टीम इंडियासाठी हानिकारक ठरू शकते.

टी 20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून सुरू

आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तान 24 ऑक्टोबर रोजी टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये आमनेसामने येतील. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताचा विजयी विक्रम 5-0 आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात, पुन्हा एकदा दोन्ही देशांदरम्यान एक रोमांचक सामना पाहायला मिळेल.