Cricket News : झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने 290 धावांचा डोंगर उभा केला आहे. युवा फलंदाज शुभमन गिलच्या शतकी खेळीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली. आजच्या सामन्यामध्ये आणखी एका खेळाडूने दर्जेदार खेळी केली आहे ज्यामुळे त्याचं संघातील स्थान पक्क होण्यास मदत होणार आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान किशनला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तर दुसऱ्या सामन्यात त्याने 13 चेंडूत केवळ 6 धावा केल्या. या सामन्यानंतर त्याच्यावर खूप दडपण होते, मात्र तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून त्याने हे दडपण कमी केलं आहे. या सामन्यात इशानने 61 चेंडूत 50 धावांची खेळी केली असून यामध्ये 6 चौकार मारले.
अंतिम 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी इशान किशन फॉर्मसाठी झगडताना दिसला होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र आजच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी करत इशानने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
दरम्यान, इशानच्या बरोबरीने संजूसुद्धा उत्तम दर्जाचं प्रदर्शन करत आहे. त्यामुळे आता संघात स्थान भक्कम करायचं असेल तर चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे.