दिल्ली रणजी टीमची जबाबदारी इशांत शर्माकडे

भारतीय क्रिकेट टीममधील फास्टर बॉलर इशांत शर्मा याला एका टीमची कॅप्टनशीप सोपवण्यात आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 22, 2017, 11:58 PM IST
दिल्ली रणजी टीमची जबाबदारी इशांत शर्माकडे  title=
File Photo

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीममधील फास्टर बॉलर इशांत शर्मा याला एका टीमची कॅप्टनशीप सोपवण्यात आली आहे.

रणजी सीजन सुरु होण्यापूर्वी गौतम गंभीरने दिल्लीच्या रणजी टीमचं कॅप्टनपद सोडलं आहे. त्यामुळे आता गंभीरच्या जागेवर इशांत शर्मा दिल्लीच्या टीमची धूरा सांभाळणार आहे.

गौतम गंभीर गेल्या चार सीजनपासून रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या टीमचे नेत्रृत्व करत होता. कॅप्टनशीप सोडली असली तरी गौतम गंभीर प्लेअर म्हणून टीममध्ये राहणार आहे.

डीडीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गौतम गंभीरने डीडीसीएला पत्र लिहीत आपल्या निर्णयाची माहिती कळवली आहे. त्याने लिहिलं आहे की, टीमची जबाबदारी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर सोपविण्याची ही योग्य वेळ आहे. यामुळे मी टीममध्ये माझं चांगलं योगदान देऊ शकेल.