Rohit Sharma: ते अजूनही सिक्रेटच आहे...! पहिल्या सामन्यापूर्वीच असं का म्हणतोय रोहित शर्मा?

Rohit Sharma: भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस झाली. यामध्ये रोहित शर्माने पीच आणि टीम संयोजनाबाबत काही गोष्टी सांगितल्या. यावेळी प्लेईंग 11 मध्ये 4 स्पिनर्सचा समावेश करण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 5, 2024, 11:35 AM IST
Rohit Sharma: ते अजूनही सिक्रेटच आहे...! पहिल्या सामन्यापूर्वीच असं का म्हणतोय रोहित शर्मा?

Rohit Sharma: टीम इंडियाच्या मिशन टी-20 वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होणार आहे. आयरलँडविरूद्ध टीम इंडियाचा पहिला सामना आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या पीचवर गोलंदाजांची उत्तम कामगिरी पाहायला मिळतेय. त्यामुळे आता अशा परिस्थितीत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. 
 
दरम्यान भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस झाली. यामध्ये रोहित शर्माने पीच आणि टीम संयोजनाबाबत काही गोष्टी सांगितल्या. यावेळी प्लेईंग 11 मध्ये 4 स्पिनर्सचा समावेश करण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं रोहितने म्हटलं.

4 स्पिनर्स मैदानावर उतरणार रोहित?

टीम इंडिया 4 स्पिनर्ससोबत मैदानात उतरणार का हा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. त्यावेळी रोहितने हे अजूनही सिक्रेट असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "आमच्याकडे दोन स्पिनर्स आणि दोन ऑलराऊंडर आहेत. यामध्ये कुलदीप, युझवेंद्र यांच्याशिवाय जडेजा आणि अक्षरसारखे खेळाडू आहेत. जर तुम्हाला टीमचा समतोल साधायचा असेल तर तुमच्याकडे ऑलराऊंडर खेळाडू असणं आवश्यक आहे. 

रोहित शर्मा पुढे म्हणाला, "या चौघांची ( 4 स्पिनर खेळाडूंची ) भूमिका या वर्ल्डकपमध्ये कशी महत्त्वाची असेल, याबद्दल आम्ही अजून विचार केलेला नाही. हे चौघे एकत्र सामन्यात कसं काम करतील यात शंका नाही. जशी परिस्थिती समोर येईल, त्यानुसार आम्ही निर्णय घेणार आहोत. या चारही खेळाडूंचा योग्यरितीने वापर होईल यावरच आमचा भर असणार आहे. या चौघांना एकाच सामन्यात खेळायची संधी मिळाली तर ते उत्तमच आहे. मात्र तसं नाही झालं तर आम्ही त्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढू.

टी-20 वर्ल्डकप 2024 साठी कशी आहे टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

टी-20 वर्ल्डकप 2024 साठी कशी आहे आयरलँडची टीम

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, एंड्रयू बालबर्नी, कर्टिस कँपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, जोश लिटिल, बॅरी मॅक्कार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, बेन व्हाईट, क्रेग यंग