Jasprit Bumrah च्या पोस्टनंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया, म्हणाले...

टी 20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह भारतीय संघात नसणार आहे. दुखापतीमुळे बुमराह टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियातील भारताच्या खेळावर नक्कीच परिणाम होणार आहे.

Updated: Oct 4, 2022, 05:58 PM IST
Jasprit Bumrah च्या पोस्टनंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया, म्हणाले... title=

Jasprit Bumrah Post Hardik Pandya And Suryakumar Yadav Reaction: टी 20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह भारतीय संघात नसणार आहे. दुखापतीमुळे बुमराह टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियातील भारताच्या खेळावर नक्कीच परिणाम होणार आहे. कारण डेथ ओव्हर्सची गोलंदाजी ही सध्या टीमसाठी सर्वात मोठी चिंता आहे. जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  "यावेळेस मी टी20 विश्वचषकाचा भाग असणार नाही याचे मला दु:ख झाले आहे. पण माझ्या चाहत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि समर्थनाबद्दल मी आभारी आहे. मी बरा होताच ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला पाठिंबा देईन," असे बुमराहने ट्विटमध्ये म्हटलं आहे. या पोस्टनंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 

"जसप्रीत तु पुन्हा त्या ताकदीने मैदानात परतशील, लवकर बरा हो, ही सदिच्छा", असं ट्वीट सूर्यकुमार यादवने केलं आहे. तर "माझा जस्सी, तू नेहमीप्रमाणे कमबॅक करशील, यात शंका नाही.", असं ट्वीट हार्दिक पांड्याने केलं आहे. 

जसप्रीत बुमराहनं भारतासाठी 30 कसोटी, 72 वनडे आणि 60 टी 20 सामने खेळला आहे. बुमराहने कसोटी 128, वनडेत 121 आणि टी 20 सामन्यांमध्ये 70 गडी बाद केले आहेत.