यंदाच्या IPL लिलावात सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या मालक काव्या मारन चांगल्याच चर्चेत होत्या. काव्या यांनी 34 कोटींची गुंतवणूक केली.
IPL Auction 2024 : दुबईत आयपीएल 2024 साठीचा लिलाव झाला. 10 संघांचे मालक या लिलावात सहभागी झाले. 332 खेळाडूंवर बोली लागली. 77 खेळाडूंवर मालकांनी सट्टा लावला. आयपीएलच्या इतिहासात मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकातानं मिचेलवर 24 कोटी 75 लाखांची बोली लावली. तर, पॅट कमिन्सला हैदराबादकडून साडेवीस कोटींना खरेदी केला आहे. या लिलावात सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या मालक काव्या मारन 340000000 इतके बजेट घेऊन बसल्या होत्या.
आयपीएलच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. KKRनं त्याची 24 कोटी 75 लाखांमध्ये खरेदी केली. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरलाय, तर दुसरीकडे हैदराबाद सनरायझर्सनं 20.5 कोटी मोजून पॅट कमिन्सला आपल्या संघात घेतलंय. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या मालक काव्या मारनने पॅट कमिन्सवर मोठा सट्टा खेळला. काव्याने 20.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. काव्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 34 कोटी रुपये गुंतवले होते. काव्याने 3 कोटी 20 लाख रुपये सेव्ह केले आहेत. सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ही सन टीव्हीचे मालक आणि अब्जाधीश कलानिथी मारन यांची मुलगी आहे. काव्यासोबत, तिचे वडील सनरायझर्स हैदराबादचे सह-मालक आहेत. 2018 मध्ये कलानिथी मारन यांनी या फ्रँचायझीची कमान आपल्या मुलीवर सोपवली. सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त, काव्या सन टीव्ही नेटवर्कच्या व्यवसायाची धुरा देखील अत्यंत जबाबदारीने सांभाळत आहे.
आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन उच्चशिक्षित आहे. काव्याने परदेशात शिक्षण घेतले आहे. काव्याचे प्राथमिक शिक्षण चेन्नईतून झाले. काव्याने चेन्नईतील स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य पदवी घेतली. यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली. तिथे तिने बिझनेस स्कूलमधून एमबीए केले.
जन भारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार काव्याची अंदाजे एकूण संपत्ती 409 कोटी रुपये इतकी आहे. काव्याचे वडील कलानिथी मारन यांनी IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2019 मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. तेव्हा त्यांची संपत्ती 19000 कोटी रुपये इतकी होती. मारन कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन आहे. काव्याची आई कावेरी मारन या सोलर टीव्ही कम्युनिटी लिमिटेडच्या सीईओ आहेत. कावेरी या भारतातील सर्वाधिक पगार घेणार्या व्यावसायिक महिलांपैकी एक आहेत. मारन कुटुंब राजकारणात देखील सक्रिय आहे. काव्या यांचे काका दयानिधी मारन हे डीएमके पक्षाशी संबंधित आहेत, तर त्यांचे वडील तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री मुरासोली मारन यांचे पुत्र आहेत.