क्रिकेटपासून दूर असताना धोनी करतो 'ही' कामं

भारत विरूद्ध श्रीलंकेच्या सामन्यात एम एस धोनीवर अनेक चर्चा रंगल्या. शेवटच्या सामन्यातील धोनीची 'ती' पोझ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाली. त्यानंतर त्याच्या खेळावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 1, 2017, 08:39 PM IST
क्रिकेटपासून दूर असताना धोनी करतो 'ही' कामं title=

मुंबई : भारत विरूद्ध श्रीलंकेच्या सामन्यात एम एस धोनीवर अनेक चर्चा रंगल्या. शेवटच्या सामन्यातील धोनीची 'ती' पोझ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाली. त्यानंतर त्याच्या खेळावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले.

असं सगळं असताना चाहत्यांच्या मनातून धोनीची प्रतिम काही हलली नाही. 'कॅप्टन कूल' म्हणून लोकप्रिय असलेल्या धोनीची जागा तसूभर देखील हलली नाही. आणि त्याला कारण फक्त त्याचा गेम नाही तर त्याला कारण आहे त्याच्यातील 'माणुसकी'.  स्टार क्रिकेटर असूनही तो सामान्य व्यक्तीसारखे जीवन जगत असतो. खरं तर एवढी लोकप्रियता आणि स्टारडम मिळाल्यानंतरही धोनी खूप साधं आयुष्य अगदी सिंपल आयुष्य जगत असतो. आपल्या घरी आणि खासकरून होम टाऊनमध्ये रांचीत महेंद्र सिंह धोनी एक साधं आणि सामान्य आयुष्य जगत असतो. तो घरात कोणताही स्टार नसून साक्षीचा नवरा असतो मुलीचा लाडका बाप असतो.  धोनी नेमकं काय करतो हे पाहूया…

धोनी जेव्हा रांचीमध्ये असतो तेव्हा तो अगदी साधेपणाने राहतो. म्हणजे अगदी तो सहज बाईक चालवताना दिसत असतो. त्याच्यासमवते सिक्युरिटी सुद्धा नसते. तसेच काही महिन्यापूर्वी धोनी जेव्हा रांचीत बाईकवर फिरायला निघाला तेव्हा त्याने मस्त पावसाची मजा लुटली. धोनी भिजत स्टेडिअमवर पोहोचला होता आणि त्याचा तो फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. असे अनेकदा घडले आहे सकी धोनी आपल्या शहरात बिनधास्त फिरताना दिसतो.

Dhoni-16

घरी असताना तो बाईक रिपेयरिंग, कार क्लीनिंग, मार्बल पॉलिशिंग यासारखी कामे करतो. फोटो बघून धक्का बसला असेल पण हे खरं आहे. धोनी आपल्या रांचीत ही सामान्य वाटणारी कामं अगदी मनापासून करतो. 

Dhoni
धोनी आपले केस टॉप हेयर सलूनमधील फेमस हेयर स्टायलिस्टकडून नव्हे तर साध्या लोकांकडून कापतो.आपण प्रत्येकवेळी पाहतो क्रिकेटर आणि त्यांचं स्टारडम. पण धोनीच्या बाबतीत हे अगदी विरूद्ध आहे. धोनी अगदी सामान्य स्वरूपात घरी वावरत असतो. 

Dhoni-1
बाईक रिपेयर करतानाचा मागील वर्षीचा धोनीचा फोटो. आपल्याला माहितच आहे की धोनीला बाईकवरून फिरायला अतिशय आवडतं. त्यामुळे तो बाईकवरून फिरणं प्रचंड एन्जॉय करतो. 

Dhoni-2
चप्पलशिवाय देवरी मंदिरात जाताना धोनी..धोनीची या मंदिरातील देवीवर श्रद्धा आहे. 

Dhoni-4
रांचीतील पासपोर्ट ऑफिसमध्ये पत्नी साक्षीसमवेत धोनी…साऱ्यांना माहितच आहे साक्षी लग्नापूर्वी एअर होस्टेस होती. त्यामुळे तिचा आणि पासपोर्टचा घनिष्ट संबंध असणारच. असंच एकदा पासपोर्ट ऑफिसमध्ये धोनी तिच्यासोबत गेला तेव्हाचं छायाचित्र 

Dhoni-3

रांचीतील रस्त्यावर फर्राटा मारताना धोनीची बाईक…