एमएस धोनी, हार्दिक पंड्याचा बॉलिवू़ड गाण्यावर तुफान डान्स, पाहा VIDEO

जेव्हा कुल धोनी आऊट ऑफ कंट्रोल होतो...भन्नाट डान्सचा VIDEO आला समोर 

Updated: Nov 28, 2022, 09:59 PM IST
एमएस धोनी, हार्दिक पंड्याचा बॉलिवू़ड गाण्यावर तुफान डान्स, पाहा VIDEO    title=

Ind vs Nz Odi : टीम इंडिया (Team India) सध्या न्युझीलंड (New zealand) दौऱ्यावर आहे. न्युझीलंड विरूद्ध 3 सामन्याची एकदिवसीय मालिका खेळतेय. या मालिकेसाठी काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सिनियर खेळाडू सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. या सिनियर खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत खेळाडू तुफान डान्स करताना दिसत आहेत. 

हे ही वाचा : Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर, पाहा VIDEO

व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि ऑल राऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) बादशाहसोबत बॉलिवूड गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कृणाल पंड्यासह इतर खेळाडू देखील आहेत.

महेंद्रसिंग धोनी(MS Dhoni) , हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्या दुबईतील एका पार्टीत बादशाशसोबत बॉलीवूड ट्रॅकवर नाचताना दिसत आहेत. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, हार्दिक पांड्या आणि एमएस धोनी आर... राजकुमारच्या गंदी बात गाण्यावर नाचताना दिसत आहेत. तसेच व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसे, क्रुणाल पांड्या आणि इतर खेळाडू  'ये जवानी है दिवानी' चित्रपटातील दिल्लीवाली गर्लफ्रेंडकडे जाण्यासाठी डान्स फ्लोअरवर सामील होतात.शेवटी, बादशाह क्रिकेटपटूंमध्ये सामील होतो आणि त्याचे पागल हे गाणे गातो.

पोस्टमध्ये काय?

हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) इंस्टाग्रामवर पार्टीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला आमचा जाम, आमचे मुव्हस...काय रात्र होती असे त्याने लिहले होते. हा व्हिडिओ काही मिनिटांपूर्वी शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओला 8.6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.आणि ही संख्या झपाट्याने वाढत आहे. 

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युझरने लिहले आहे की, मॅड सीन्स, "एमएसडीला असे नाचताना पाहणे! एका पिढीतील क्षण एकदाच. दुसर्‍या युझरने लिहले की, "बेस्ट ऑफ बेस्ट, एमएस किंग (MS Dhoni) , असे लिहले आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.