इंग्लंडमध्ये विराट खरंच विजय माल्ल्याला भेटला?

भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे.

Updated: Aug 1, 2018, 09:26 PM IST
इंग्लंडमध्ये विराट खरंच विजय माल्ल्याला भेटला? title=

लंडन : भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. पण भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट कोहलीबरोबर विजय माल्ल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करण्यात आला. पण फोटोमध्ये विराटबरोबर असलेला तो माणूस विजय माल्ल्या नाही तर विजय माल्ल्यासारखा दिसणारा आहे. या फोटोमध्ये विराट कोहलीनं त्या व्यक्तीच्या पाठीवर हात ठेवला आहे.

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून विजय माल्ल्या इंग्लंडला पळाला आहे. माल्ल्याला परत भारतात आणण्यासाठी इंग्लंडच्या न्यायालयामध्ये खटला सुरु आहे. आयपीएलमध्ये विराट कोहली विजय माल्ल्याच्या बंगळुरू टीमकडून खेळत होता. पण विजय माल्ल्यानं आता रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे माल्ल्याचा आणि आयपीएलमधल्या बंगळुरू टीमचा काहीही संबंध नाही. विराट कोहली हा बंगळुरू टीमचा कर्णधार आहे. 

 

They all love him here #KingKohli

A post shared by Team India (@indiancricketteam) on