मुंबई: पाकिस्तान क्रिकेट टीमच्या कर्णधारावर लैंगिक शोषणाचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा कर्णधार आपल्याच बहिणीसोबत विवाहबंधनात पुढच्या वर्षी अडकणार असल्याची माहिती पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजच्या सूत्रांकडून समोर आली आहे. या वृत्तामुळे सध्या खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम आणि त्याच्या बहिणीशी विवाह करणार आहे. आपल्या चुलत बहिणीसोबत लगीनगाठ बांधणार आहे. दोन्ही कुटुंबियांकडून या गोष्टीला सहमती मिळाली आहे. पुढच्या वर्षा हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमवर लैंगिक शोषणाचा आरोप देखील झाला आहे. एका महिलेनं लैंगिक शोषणाचा आरोप करून धमकी देखील दिल्याचा आरोप आझमवर केला होता.
बाबर आझमने लग्नाचं वाचन देऊन 10 वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेनं केला. याशिवाय गर्भवती राहिल्यानंतर बाबरने या महिलेला जबरदस्त मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं या महिलेनं आरोप केला होता.
बाबरला पाकिस्तान क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार म्हणून नेमण्यात आले. तो यापूर्वीच संघाचा एकदिवसीय आणि टी -20 कर्णधार आहे. त्याने आत्तापर्यंत 33 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 42.53 च्या सरासरीने 2169 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, 80 एकदिवसीय सामन्यात त्याने 56.84 च्या सरासरीने 3808 धावा केल्या. बाबरने 54 टी -20 सामन्यांमध्ये 47.33 च्या सरासरीने 2035 धावा केल्या आहेत.