मुंबई : आयपीएलचा ११वा मोसम संपल्यानंतर आता १४ जूनला भारताची अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच आहे. या टेस्ट मॅचआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. विकेट कीपर ऋद्धीमान सहाला दुखापत झाली आहे. त्यामुळे सहा या मॅचमध्ये खेळणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. सहाऐवजी कोणत्या विकेट कीपरला संधी मिळेल याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. सहा आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळला. कोलकात्याविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सहाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला चेन्नईविरुद्धची फायनलही खेळता आली नाही. सहाची अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्ट टीममध्ये निवड करण्यात आली आहे. पण आता सहाऐवजी दिनेश कार्तिक किंवा पार्थिव पटेलला संधी दिली जाऊ शकते.
याआधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टेस्ट टीममध्येही ऋद्धीमान सहाची निवड करण्यात आली होती. पण सेंच्युरिअनमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचआधी सहाच्या मांड्यांच्या स्नायूंना दुखापत झाली होती. त्यामुळे सहाऐवजी पार्थिव पटेलला या मॅचमध्ये संधी देण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये पटेलला चकमदार कामगिरी करता आली नाही.
पार्थिव पटेलनं आत्तापर्यंत २५ टेस्ट मॅचच्या ३८ इनिंगमध्ये ६ अर्धशतकांसोबत ३१.१३ च्या सरासरीनं ९३४ रन केल्या आहेत. पार्थिवनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये १९ रन आणि तिसऱ्या टेस्टमध्ये २ आणि १६ रन केल्या होत्या.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली तर ८ वर्षानंतर त्याचं भारतीय टीममध्ये पुनरागमन होईल. दिनेश कार्तिक २०१० साली बांगलादेशविरुद्ध टेस्ट मॅच खेळला होता. २००४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये कार्तिकनं टेस्ट क्रिकेटमध्ये आगमन केलं होतं. कार्तिकनं २३ टेस्ट मॅचमध्ये १,००० रन केल्या आहेत. दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. निडास ट्रॉफीच्या फायनलमधली वादळी खेळी आणि आयपीएलमध्ये कार्तिकनं शानदार प्रदर्शन केलं आहे.
ऋद्धीमान सहाबद्दल बीसीसीआयकडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सहाला तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागेल एवढीच प्रतिक्रिया बीसीसीआयनं दिली आहे. सहाच्या दुखापतीवर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत. पण सहा खेळण्यासाठी फिट आहे का नाही याबाबत डॉक्टरांनी अजून कोणतीही माहिती दिलेली नसल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे.
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.