'या' मॅचमध्येही प्रणव धनावडेने केला हंगामा

 गुरू नानक कॉलेजविरोधात त्याने दुहेरी शतक झळकावले. २३६ रन्सच्या आपल्या खेळात त्याने ३५ चौके आमि ३ सिक्सर लगावले. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 8, 2018, 12:13 PM IST
'या' मॅचमध्येही प्रणव धनावडेने केला हंगामा title=

मुंबई : १००९ रन्स बनवून 'हंगामा' करणाऱ्या प्रणव धनावडेने पुन्हा एकदा आपला 'जलवा' दाखविला आहे.अनेक दिवस शांत असलेली प्रणवची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. त्याने एका दिवसात २३६ रन्स खेळत ब़ॉलर्सना हैराण करुन सोडले.  आपल्या १००९ रन्सच्या वर्षपूर्तीनिमित्त त्याने धमाकेदार दुहेरी शतक झळकावले आहे. 

दुहेरी शतक

इंटर कॉलेज मॅचदरम्यान झुंझुनवाला कॉलेजसाठी खेळताना प्रणवने हा कारनामा केला आहे. गुरू नानक कॉलेजविरोधात त्याने दुहेरी शतक झळकावले. २३६ रन्सच्या आपल्या खेळात त्याने ३५ चौके आमि ३ सिक्सर लगावले. 

रेकॉर्ड तोडला 

प्रणवने दीड वर्षापूर्वी इंटर स्कूल मॅचमध्ये १००९ रन्स बनवत ११७ वर्षापूर्वीचा जुना रेकॉर्ड तोडला.  ब्रिटनच्या एईजे कोलिन्सने क्लार्क हाऊसविरुद्ध खेळताना नॉर्थ टाउनमध्ये १८९९ मध्ये नाबाद ६२८ रन्स बनविले होते.

दरवर्षी १० हजार रुपये 

प्रणवने हा रेकॉर्डही तोडला. त्याचा हा रेकॉर्ड पाहता मुंबई क्रिकेट संघ (एमसीए) ने त्याला पाच वर्षापर्यंत दरवर्षी १० हजार रुपये देण्याची घोषणा केली.