मुंबई : श्रीलंका विरूद्ध भारत टी-20 सिरीज असून आज धर्मशालामध्ये दुसरा सामना रंगणार आहे. पहिला सामना टीम इंडियाने जिंकून सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशातच आजचा सामना जिंकल्यास टीम इंडिया सिरीज जिंकू शकते. मात्र यामध्ये एक मोठी अडचण निर्माण होऊ शकते. श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 वर पावसाचं सावट असण्याची शक्यता आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये धर्मशालाच्या मैदानावर दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. मात्र चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे ती म्हणजे मैदानावर काल रात्री पासून पाऊस असल्याची माहिती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शानिवारी या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 90 टक्के पावसाची शंका असून तापमान गार असू शकतं.
दरम्यान आजच्या दुसऱ्या सामन्यात युझवेंद्र चहलला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात येईल. गेल्या काही सामन्यांमध्ये कुलदीप यादवने चांगला खेळ करून दाखवला आहे.
रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल.