नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिने RCB फॅन्सचा घात केला? हा माझा ''सुपर हिरो''

'नॅशनल क्रश' असलेली सुपरहिट दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय 

Updated: May 19, 2021, 05:04 PM IST
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिने RCB फॅन्सचा घात केला? हा माझा ''सुपर हिरो'' title=

मुंबई : साऊथ सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून अचानक क्रिकेट जगतात चर्चेत आली. रश्मिकाने विराट कोहलीचा संघ आरसीबी आपला आवडता संघ म्हणून सांगू लागली. यानंतर तिच्यावरती चाहत्यांनी अनेक मीम्स तयार केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

आता जवळपास एक महिन्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदा कारण आहे तिच्या आवडीचा क्रिकेटर. रश्मिकाने हल्ली आपल्या इंस्टाग्रामवर लाइव्ह केलं होतं. जेव्हा तिला तिच्या चाहत्याने लोकप्रिय क्रिकेटर कोण? असं विचारलं होतं. चाहत्यांना वाटत होतं आरसीबीला पसंत करणारी रश्मिका विराट कोहलीचं नाव घेईल. मात्र झालं उलटंच. 

25 वर्षांची अभिनेत्री चेन्नई सुपर किंग्सचे कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला पसंत करत आहेत. तिने म्हणाली की,'धोनीची फलंदाजी, कॅप्टनशिप, विकेटकिपिंग सगळ्याच गोष्टी आवडतात. तो माझा हिरो आहे.'

25 वर्षांची रश्मिका मंदाना साऊथसोबतच उत्तर भारतीय सिनेमातही लोकप्रिय आहे. रश्मिकाने कन्नड, तमिळ आणि तेलुगू सिनेमात काम केलं आहे. आतापर्यंत तिने 10 सिनेमात काम केलं आहे. तिला या दिवसांत 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखलं जातंय. 

रश्मिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. बॉलिवूडमध्येही तिचे लाखो चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर वायरल झालेल्या या व्हिडिओत रश्मिका हातात नांगर घेऊन चिखलात नांगरणी करत आहे. यात ती एखाद्या सर्वसाधारण शेतकऱ्याप्रमाणे मेहनत करताना दिसत आहे. तिने अगदी साधा शर्ट परिधान केला असून कमरेपासून खाली एक कपडा गुंडाळला आहे. तर आजूबाजूला गावकऱ्यांची गर्दी पाहायला मिळतेय आणि ते सगळे रश्मिकाकडे एकटक पाहताना दिसतायत. त्यांनाही रश्मिकाचं कौतुक वाटत आहे.